आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंबद्दल फेसबूकवर अपशब्द; महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंचायत समिती अधिकाऱ्याच्या अंगावर महिला जिल्हाप्रमुखाने फेकली शाई

बीड- शिवसेनेच्या फेसबुक पेजवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीवरची कमेंट केल्याप्रकरणी एका शासकीय अधिकाऱ्याच्या अंगावर भर कार्यालयात शाई फेकण्यात आल्याचा प्रकार बीड पंचायत समितीच्या कार्यालयात घडला. संतप्त महिला शिवसैनिकांनी अधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकत त्याच्या तोंडालाही काळं फासण्याचा प्रयत्न केला. बीड पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त कमेंट केल्यामुळे  महिला आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. संगिता चव्हाण यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन कुलकर्णी यांचा पाणउतारा करत त्यांच्या अंगावर शाई फेकली. एवढेच नाही तर सुनील कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासण्याची प्रयत्न केला. तसेच, अधिकाऱ्यांची लायकी काढत माफी मागायला लावली. इथून पुढे ठाकरे सरकार बद्दल अपशब्द काढला तर याद राख असा सज्जड दमही दिला. बीड पंचायत समितीच्या आवरत झालेल्या या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला

उद्धव ठाकरेंबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिका केल्यामुळे हिरामणी तिवारी नावाच्या व्यक्तीला शिवसैनिकांनी भर चौकात आणून त्याचे टक्कल केले होते. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तुलना उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागच्या नरसंहाराशी केली होती. त्यावर हिरामणी यांनी टिप्पणी केली. मारहाणीमुळे या व्यक्तीच्या कानाच्या पडद्याला दुखापत झाली होती. शिवसैनिकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी व्यक्तीने केली.

बातम्या आणखी आहेत...