• Home
  • National
  • Other State
  • Govt school class 10 student Adhish Goyal made grain grading machine for farmers after watching mother cleaning manually

आईला गहु साफ / आईला गहु साफ करताना पाहून आली IDEA, 10 वीच्या विद्यार्थ्याने बनवली अनोखी क्लिनींग मशीन...


राष्ट्रीय पातळीवर झाले सलेक्शन

दिव्य मराठी वेब टीम

Jan 28,2019 06:36:00 PM IST

बारां(राजस्थान)- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आकर्षण वाढवण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान विभागातर्फे इंस्पायर अवार्ड अंतर्गत जिल्ह्यातील छीपाबड़ौदच्या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय मॉडल प्रदर्शनीमध्ये सलेक्शन झाले आहे. सरकारी शाळेत 10वीत शिकणाऱ्या अदिश गोयलने गहु ग्रेडिंग प्लँट बनवला आहे, त्याचे सलेक्शन राष्ट्रीय स्तर मॉडल प्रदर्शनीमध्ये झाले आहे. या प्लँटमध्ये गहु दळण्यासोबत ते साफदेखील होते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गव्हाची चांगली किंमत मिळेल. आता हे मॉडेल फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय मॉडल प्रदर्शनीमध्ये शास्त्रज्ञ आणि आधिकाऱ्यांसमोर प्रदर्शित केले जाईल. एडीईओ माध्यमिक प्रहलाद राठौरने सांगितले की, केंद्र सरकारकडून मुलांमध्ये विज्ञनाबद्दल आकर्षण वाढवण्यासाठी इंस्पायर अवार्ड स्पर्धा आोयजित केली जात आहे. यातून ऑनलाइन पद्धतीने मुलांकडून इनोव्हेशन आयडिया घेतल्या जातात. त्यातील ठराविक चांगल्या आयडिया असलेल्या विद्यार्थ्यांचे सलेक्शन केले जाते.


80 मॉडलमधून झाले सलेक्शन

सरकारकडून मॉडेल तयार करण्यासाठी काही सहाय्यता म्हणून पैसेही दिले जातात. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या संभाग येथील स्पर्धेत 17 विद्यार्थ्यांसोबत इतर 200 जणांनी भाग घेतला होता. यातून संभागच्या 8 विद्यार्थ्यांचे सलेक्शन झाले होते. यांत आदिशने बनवलेल्या मशीनचाही समावेश आहे.

आदिशने सांगितले- घरी आईला गहु साफ करताना पाहून ही आयडिया आली. कारण घरात एत क्विंटल गव्हाला साफ करण्यासाठीच दोन तीन दिवस लागतात. त्यामुळेच मी गव्हाला साफ करण्यासाठी ही मशीन तयार केली. आदिशने सांगितले की, या तंत्राने कमी किमतीत पीठाची मशीन तयार केली जाउ शकते. या मशीनमध्ये एक बॅट्री, मोटर आणि ग्रेडिंगसाठी तीन चाळण्या आहेत. वरून टाकलेला गहु चाळण्यातून जातो आणि त्यामुळे त्यातील कचरा साफ होऊन तो बाजुला पडतो.

X
COMMENT