आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. केंद्र प्रमुखांच्या शाळाभेटीवर आता जीपीएस कॅमेऱ्याची नजर, जळगावच्या धरतीवर कार्यपद्धतीचा शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रयोग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  जळगावच्या धरतीवर आता औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे केंद्रप्रमुख आपापल्या भागातील शाळांना भेटी देतात का? कधी भेट देतात? किती वाजता भेट दिली? उद्देश काय होता? याबाबतची संपुर्ण माहितीवर आता जीपीएस प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागातर्फे हालचाली सुरु असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरज प्रसाद जयस्वाल यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यात एकूण 128 केंद्र प्रमुख कार्यरत आहेत. केंद्रप्रमुखांनी दररोज किमान दोन शाळांना भेट देणे अपेक्षित असत. मात्र बऱ्याचवेळा केंद्रप्रमुख शाळांना भेट देत नाहीत. तसेच सुट्टीवर असताना शाळा भेटीला गेल्याची खोटी माहिती  सांगितली जाते. यासाठी केंद्र प्रमुखांकडून कागदोपत्रीच भेटीचे नियोजन केले जाते, परंतू प्रत्यक्षात सुट्टी घेतलेली असते. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे केंद्रप्रमुखांसह शिक्षण विभागात कार्यरत दीडशे कर्मचाऱ्यांना गुगलवरुन  मोबाईलवर डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे अॅप कशा पद्धतीने वापरावे, माहिती कशी पाठवावी यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असेही जयस्वाल म्हणाले.प्रत्येक कामाची द्यावी लागेल अपडेट माहिती 
 
केंद्रप्रमुखांनी किती वाजता शाळेला भेट दिली ती वेळ, तारीख, ठिकाणावरुन फोटो काढून शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवावा लागणार आहे. त्यामुळे अॅपमुळे केंद्रप्रमुखांनी भेट कधी दिली ही अचूक माहिती शिक्षण विभागाला कळणार आहे. भेट दिल्याचे फोटो शिक्षणाधिकारी यांना मिळाल्यानंतर त्याच्यावर योग्य व अचूक माहिती दर्शविली जाणार आहे. या अॅपमुळे आपल्या कर्तव्यात  कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आळा बसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...