आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारी झाल्याने उच्चशिक्षित तरुणाकडून सात दुचाकींची चोरी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उच्चशिक्षित व्यक्तीने दुचाकी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरी केलेली दुचाकी विक्री करताना पकडले जाऊ नये यासाठी त्याने चक्क दुचाकी खोलून पार्टस विक्री करण्याचे ठरवले. मात्र, पार्टस विक्रीसाठी फिरताना खडक पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून सात वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी प्रसिध्द हॉटेलमध्ये मॅनेजर होता, कर्ज बाजारी झाल्याने त्याने वाहन चोरीचे सत्र अवलंबले होते. 


गौरव राजकुमार शर्मा (३०, रा. राजमाता कॉलनी लेन , चोरडीया फार्म,कोंढवा बुद्रुक ,मुळ उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 


चोरलेल्या वाहनांच्या सुट्या पार्टसची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती फिरत आहे, अशी माहिती पोलिस हवालदार फहिम सय्यद आणि शिपाई आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार खडक पोलिसांच्या पथकाने दि. ९ मार्च रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सापळा रचून गौरव शर्मा याला अटक केली. तसेच त्याच्याकडे तपास केला असता खडक २, वानवडी ३ आणि भोसरी आणि पौड पोलिस ठाणे प्रत्येकी १ असे एकूण ७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आरोपीवर चतुश्रृंगी पोलिस ठाणे आणि वाकड पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...