आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७ हजारांची लाच घेताना ग्रामसेविकेला पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर- साक्री तालुक्यातील शेंदवड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका ज्योती तेज्या गांगुर्डे (वय ३२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने मंगळवारी सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 


चौदाव्या वित्त आयोगांतर्गत केलेल्या कामावर देखरेख केल्याच्या व केलेल्या कामाचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेविका गांगुर्डे यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती; परंतु तक्रारदाराने तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे मान्य केले. तसेच या विषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 


त्यानुसार ज्योती तेज्या गांगुर्डे यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...