आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन रेल्वे मार्गांच्या मधोमध उभं होतं कुटुंब.. अचानक दोन्ही रुळांवर आली भरधाव लोकल, क्षणार्धात घडला अनर्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील मूळ रहिवासी तसेच मुंबईतील कल्याण-कोपर पूर्वेला राहणाऱ्या तिघांचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये मायलेकाचा समावेश आहे. डोबिंवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (ता.3) दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे सांगवी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

सांगवी बुद्रुक गावातील राहिवासी सुनीता धनराज भंगाळे (वय-62), प्रीती उदय राणे (वय-26) व 2 वर्षीय लिवेश उदय राणे अशी मृतांची नावे आहेत. मागील काही वर्षांपासून राणे कुटुंबिय कल्याणमधील कोपर पूर्वे परिसरात राहत आहे. रविवारी सर्वजण कोपर पश्चिमला एका कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास हे सर्वजण रेल्वे रुळजवळ उभे होते . मात्र अचानक एकाच वेळी फास्ट ट्रॅकवर दोन्ही बाजूंनी भरधाव लोकल गाड्या आल्या. त्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला. गोंधळलेले हे सर्वजण दोन ट्रॅकच्या मधोमध थांबले. रेल्वे गाडीच्या हवेच्या दाबामुळे तिघे गाडीखाली खेचले गेल्याने मृत्यू झाला. या घटनेत एक जण बचावला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेचे वृत्त सांगवी येथे समजतात गावावर शोकाकळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...