आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तीने केला मनक्याच्या हाडाचा एक्स-रे, रिपोर्ट आला तेव्हा यामध्ये दिसला एक चेहरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिवरपूल. इंग्लंडमध्ये वयस्कर व्यक्ती रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. एक्स-रे केल्यानंतर आलेल्या रिपोर्टमुळे ती हैराण झाला. या व्यक्तीला गेल्या अनेक वर्षांपासून कँसर होता. ते मनक्याच्या हाडांच एक्स-रे करण्यासाठी पोहोचला होते. जेव्हा त्याचे रिपोर्ट आले तेव्हा त्यामध्ये हाडांमध्ये एक डॉगीचा चेहरा दिसला. हे पाहून सर्वच शॉक्ड झाले. परंतु डॉक्टर्स म्हणाले की, हे सर्व भ्रम आहेत. 


एक्स-रेमध्ये दिसला डॉगीचा चेहरा 
- ही स्टोरी 70 वर्षांच्या वयस्कर व्यक्ती पीटर केवेनेघ यांची आहे. ते आपल्या 50 वर्षीय पत्नी टेससोबत इंग्लंडच्या बर्केलहेड शहरात राहतात. काही वर्षांपर्यंत पीटर अन्ननलिकेच्या कँसरचा सामना करत होते. तीन वर्षांपुर्वीच त्यांचा हा आजार बरा झाला. 
- परंतु हा जीवघेणा आजार आता पुन्हा परतला आहे. यावेळी पीटरला मनक्याच्या हाडांमध्ये वेदना होत होत्या. या दरम्यान ते स्पाइनचे स्कॅन करण्यासाठी लिव्हरपूलच्या वाल्टन हॉस्पिटल येथे गेले होते. याचा रिपोर्ट आल्यानंतर ते रिपोर्ट पाहून हैराण झाले. 
- पीटरच्या एक्स-रे रिपोर्टमध्ये एका डॉगीचा चेहरा दिसत होता. ज्या ठिकाणी त्यांना कँसर झाला होता, त्याच ठिकाणी हा चेहरा दिसत होता. 


20 पेक्षा जास्त नातवं
- याविषयी पीटर म्हणाले की, 'हे आम्हाला स्वप्नासारखे वाटत आहे. माझी बायको तेव्हापासून म्हणते की, हा डॉगी भुंकतो की नाही. ज्या ठिकाणी मला कँसर झाला होता, त्याच ठिकाणी या डॉगीचे नाक दिसतेय.'
- 'माझ्या एक्स-रे रिपोर्टमध्ये दिसणारा डॉगी कोणत्या ब्रीडचा आहे यावरुन आमच्या कुटूंबात वाद होत आहे.'
- 'पीटरला तीन मुलं आहेत. त्या सर्वांचे मिळून त्यांना 20 पेक्षा जास्त नातवं आहेत.' त्यांनी सांगितले की, कँसर अजिबात चांगला आजार नाही. परंतु तरीही आपल्याला हसत लढाई द्यावी लागते.
- 'मला आशा आहे की, यामुळे अनेक लोकांच्या चेह-यावर हास्य येईल. विशेष म्हणजे ज्यांची स्टोरी आमच्यासारखी आहे. तुम्ही प्रत्येक परिस्थिती हसत राहिले पाहिजे.'

 

 
 

 

बातम्या आणखी आहेत...