आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षीय चिमुकलीला आजीने सहाव्या मजल्यावरून फेकले; कारण ऐकून बसेल धक्का

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मलाडमध्ये दोन वर्षीय चिमुकलीच्या खूनाच्या आरोपात पोलिसांनी सोमवारी तिच्या 50 वर्षीय आजीला अटक केली. मुलगी आणि आरोपी महिलेचा नातू यांच्या नेहमीच भांडण होत असल्याचे तपासात समोर आले. या भांडणाला कंटाळून आजीने 2 वर्षीय चिमुकलीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकले. 

रूखसाना अंसारी असे आरोपी महिलेचे नाव आहे. अंसारी कुटुंब अप्पापाडा भागात राहते. शनिवारी सकाळी 2 वर्षीय जियाचा मृतदेह परिसरात आढळून आला होता. फ्लॅटचा दरवाजा आणि खिडकी बंद होती आणि बाहेरून प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. यामुळे मुलगी स्वतः खिडकीवर चढताना तिची तोल जाऊन ती खाली पडल्याचा सुरुवातीला अंदाज वर्तवण्याचा आला. पण पोस्टमार्टम रिपोर्ट आणि घटनास्थळी तपास करतेवेळी मुलीला कोणीतरी खाली फेकल्याचे स्पष्ट झाले. 

वारंवार बदलेल्या विधानांमुळे आजीवर आला संशय 
पोलिसांनी घरातील मुलीचे आई-वडील, आजी-आजोबा आणि आत्याची अनेकवेळा चौकशी केली. यादरम्यान रूखसाना वारंवार आपले विधान बदलत आहे आणि तिचे हावभावही संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने मुलीची हत्या केल्याचे मान्य केले. 

यामुळे केली हत्या 
रूखसानाने पोलिसांना सांगितले की, तिच्या मुलीचा मुलगा आणि मुलाची मुलगी जिया यांच्यात खेळतेवेळई नेहमीच भांडण होत होते. यामुळे तिला मुलीचा राग यायचा. शनिवारी सकाळी साडे पाच वाजता झोपेत असलेल्या मुलीली तिने स्वयंपाकघराच्या खिडकीतून बाहेर फेकले. यानंतर स्वतः झोपी गेली. डीसीपी सी एस स्वामींनी सांगितले की, आरोपी महिलेविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक केली आहे.