Home | National | Other State | Grandmothers Unique celebration to welcome the newborn grand daughter is the cutest thing

रुग्णालयातून ढोल-ताशे घेऊन नाचत गात घरी येत होते कुटुंब, लोकांनी विचारल्यावर आजीबाई म्हणाल्या, घरात लक्ष्मी आलीये!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2019, 01:18 PM IST

मुलींशिवाय हे जग चालूच शकत नाही असे वडील म्हणाले

  • Grandmothers Unique celebration to welcome the newborn grand daughter is the cutest thing

    न्यूज डेस्क - मुलांच्या तुलनेत मुलींच्या वाढत्या जन्मदराबद्दल राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्याचे राष्ट्रीय स्तरावर गौरव झाले आहे. कुणी त्याचे कारण विचारल्यास त्यांना हा फोटोच परीपूर्ण उत्तर ठरेल. वंशाचा दिवा हा मुलगाच असतो असे म्हणणाऱ्यांना येथील लोकांनी खोटे ठरवले आहे. या जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे स्वागत कशा पद्धतीने केले जाते याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. येथील जंक्शन हाऊसिंग बोर्ड सोसायटीमध्ये एका कुटुंबात मुलीने जन्म काय घेतला, आजीबाईंसह वडील आणि अख्ख्या फॅमिलीने एकच जल्लोष केला.


    नुकतेच जन्मलेल्या मुलीला घेऊन आजी रीटा शर्मा रुग्णालयातून निघाल्या. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा, सून आणि अख्ख्या कुटुंबियांसह ढोल-ताशे वाजत होते. कुटुंबातील प्रत्येक जण जल्लोष साजरे करून नाचत होता. काहींना नेमके काय घडले याची कल्पना नव्हती. एकाने विचारले, तेव्हा आजीबाई अगदी आनंदाने म्हणाल्या, की त्यांच्या घरात लक्ष्मी अवतरली आहे. त्याच लक्ष्मीचे आम्ही स्वागत करत आहोत. घरापर्यंत पोहोचले तेव्हा कुटुंबियांनी आणखी वेगळी तयारी करून ठेवली. तान्ह्याच्या बाळाची सोसायटीत एंट्री होताच फटाके फोडण्यात आले. लोकांना मिठाई वाटण्यात आली आणि फुलांचा वर्षाव झाला. समाजाला पुढे नेणाऱ्या ह्या मुलीच असतात. त्यांच्याशिवाय हे जग काहीच नाही असे वडील म्हणाले. वडील सागर शर्मा यांनीही आपल्या हातांनी लोकांना मिठाई वाटप केली.

Trending