आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुसाअंतर्गत दहा महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटी अनुदान मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठ संलग्नित तब्बल दहा महाविद्यालयांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, रुसा या स्कीमद्वारे हे अनुदान मिळेल. पायाभूत सुविधेसाठी महाविद्यालयांना अनुदान, अशी रुसाची योजना आहे. या अंतर्गत हे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. एकाच जिल्ह्याच्या विद्यापीठातील एकूण दहा महाविद्यालयांना अनुदान प्राप्त होणे सोलापूर विद्यापीठाचे मोठे यश आहे. 


विद्यापीठातील रुसा विभागाने एक कार्यशाळा आयोजित केली होती. रुसाचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. विजय जोशी, अक्षय कदम यांनी मार्गदर्शन केले होते. ही कार्यशाळा महाविद्यालयांना हे अनुदान मिळवण्यासाठी मदतीची ठरली. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक संशोधन आणि विकास विभागाचे डॉ. व्ही. बी. पाटील यांचे नियोजन व प्रयत्न या कामी आले. रुसा विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी रुसा कार्यालय मुंबई येथे पूरक नियोजन केले. 


अनुदानास प्राप्त ठरलेली दहा महाविद्यालये 
- डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स 
- ए. आर. बुर्ला वरिष्ठ महिला महाविद्यालय 
- शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते, 
- एच. एन. कॉलेज ऑफ कॉमर्स 
- संगमेश्वर महाविद्यालय 
- दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय 
- सोशल आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज 
- डी. बी. एफ. आर्टस् अँड सायन्स कॉलेज
- वालचंद आर्टस् अँड सायन्स कॉलेज 
- छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय 

बातम्या आणखी आहेत...