आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रताप गाढे
जालना - परतीच्या पावसाने झोडपलेल्या द्राक्ष बागांचे ६० टक्के नुकसान झाले आहे. यातील उर्वरीत चाळीस टक्यावरील उत्पादन हाती येईल की नाही याची शाश्वती राहिली नाही. पाऊस थांबुन आठ दिवस झाले असले तरी द्राक्ष बागांतील आद्रता मात्र, कायम आहे. परिणामी द्राक्ष बागांवर आता डाऊनीसह भुरी तसेच कुज रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामध्ये धुक्याची भर पडल्याने शेतकऱ्यांनी दिवसाला तीन फवारण्या घ्याव्या लागत आहे. यासाठी शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन हजारांचा खर्च दिवसाला करावा लागत आहे.
जिल्ह्यात सध्या सहा हजार एकरवर द्राक्षबागा असून या उत्पादकांनी एप्रील महिण्यापासून छाटणीचे नियोजन केले होते जानेवारी ते फेब्रुवारी महिण्यात द्राक्ष उत्पादन हाती येईल असे नियोजन हाेते. असे असताना सततच्या दहा ते बारा दिवसांच्या परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांना चांगलाच फटका दिल्याने या हंगामात जिल्ह्यातील एकूण द्राक्ष उत्पादनाला सध्या ६० टक्के इतका फटका बसला. राज्यातील द्राक्ष उत्पादनाचे भांडार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्याला तसेच यातील महत्वाचे गाव असलेल्या कडवंचीतही योग्य नियोजन केलेल्या शेतकऱ्यांनाही या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूणच ६ हजार एकरावर द्राक्ष उत्पादन केले जात आहे. या द्राक्ष उत्पादकांना बागांची छाटणी झाल्यानंतर त्यापासून दीडशे दिवस पुढे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते. मात्र, ऐन छाटणी केल्यानंतर घड निर्मीतीची प्रक्रीया सुरू असतानाच परतीच्या पावसामुळे ज्या ठिकाणी एका बागेवर ४० घड निर्मीती होते या ठिकाणी केवळ १५ ते १७ घडांची निर्मीती होणार असे आठ दिवसांपुर्वीच सांगीतले होते. सध्या मात्र, या १५ ते १७ घडांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना दिवसाला तीन वेळा फवारणी घ्यावी लागत आहे. यासाठी किमाण एक ते दोन हजार रूपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
जानेवारी -फेब्रुवारीत येणार द्राक्ष :
आक्टोंबर महिण्यात बागांची छाटणी करून त्यापुढच्या १०० दिवसांची प्रक्रीया ही द्राक्ष उत्पादकांसाठी मोठी मेहनतीची तसेच काळजीवाहु असते. या दिवसांतील नियोजन पुर्ण झाल्यास जानेवारी तसेच फेब्रुवारीत द्राक्ष विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होतील असे नियोजन केलेले आहे. पावसामुळे उत्पादन घटले आहे. जालना जिल्ह्यातून उत्तरप्रदेश, काेलाकाता आदी ठिकाणच्या बाजारपेठेत पाठवले जातात. मराठवाड्यातील द्राक्षांची गोडी चांगली असल्याने एकूणच बाजारपेठेत गुणवत्तेमुळे दर अधिकच मिळतो. यावर्षी उत्पादन घटले असले तरी भाव अधिक मिळाल्यास शेतकऱ्यांना आधार मिळू शकतो.
आकडेवारी अशी
> १,७०, ००० अातापर्यंतचा एकरी खर्च
> ६००० एकर जिल्ह्यातील एकूण क्षेत्र
> १०० कोटीं रुपयांची होते उलाढाल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.