आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 हजार रूपये बेसिक सॅलरी असेल तर 5 वर्ष पूर्ण झाल्यावर इतकी मिळेल ग्रॅच्युटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : आपण जर खासगी क्षेत्रात नोकरी करत आहात आणि तुमच्या नोकरीला पाच वर्ष पूर्ण झाली असतील तर तुम्ही ग्रॅच्युटीसाठी पात्र आहात. तुम्ही जर नोकरी बदलली तर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळते. तुमची बेसिक सॅलरी आणि तुमच्या नोकरीचा कालावधी यावर तुमजी ग्रॅच्युटी निर्भर असते. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या नियमानुसार कमाल 20 लाख रूपयांपर्यंत ग्रॅच्युटी मिळू शकते. तुम्ही मध्येच नोकरी सोडली तर तुमच्या निवृत्तीनंतर तुम्हाला ग्रॅच्युटी मिळत असते. 

 
15 हजार रूपये बेसिकवर इतकी मिळते ग्रॅच्युटी 

तुमचा बेसिक पगार 15 हजार रूपये आहे आणि तुमच्या नोकरीला 5 वर्ष झाली. त्यानंतर तुम्ही जर नोकरी बदलली तर तुम्हाला जवळपास 44 हजार रूपये ग्रॅच्युटी मिळेल. पण जर तुमचा बेसिक पगार 20 हजार रूपये असून तु्म्ही 5 वर्षानंतर नोकरी बदलत असाल तर तुम्हाला 57 हजार रूपये ग्रॅच्युटी मिळते. 

 

10 वर्षाच्या नोकरीवर इतकी मिळते ग्रॅच्युटी

तुम्ही 20 हजार रूपयांच्या बेसिक सॅलरीवर 10 वर्ष नोकरी केली असेल आणि तुम्ही नोकरी बदलत असाल तर तुम्हाला एकूण 1 लाख 15 हजार रूपयांची ग्रॅच्युटी मिळेल. अशाप्रकारचे तुम्ही 30 हजार रूपये बेसिक सॅलरीवर 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी बदलता किंवा सोडता तर तुम्हाला 1 लाख 72 हजार रूपये ग्रॅच्युटी मिळेल.

 

निवृत्तीवर किती मिळते ग्रॅच्युटी?

तुमची बेसिक सॅलरी 40 हजार रूपये आहे आणि तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षी रिटायर होत आहात आणि तुम्ही एकूण 33 वर्ष नोकरी केली असेल तर तुम्हाला 7 लाख 62 हजार रूपये ग्रॅच्युटी म्हणून मिळतील. 

 

नोट - ग्रॅच्युटीची हे गणित  moneycontrol.com या संकेतस्थळावरील ग्रॅच्युटी कॅलक्युलेटरद्वारे करण्यात आले आहे. यामध्ये बेसिक सॅलरी आणि नोकरीच्या कालावधीवर ग्रॅच्युटी कॅलक्युलेशन केले आहे. यामध्ये डियरनेस अलाउंस जोडण्यात आले नाही. तुमची कंपनी डियरनेस अलाउंस देत असेल तर तुमची ग्रॅच्युटी जास्त होऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...