हिंदवेअर किचन उपकरणांवर / हिंदवेअर किचन उपकरणांवर शानदार ऑफर्स उपलब्ध; किचन चिमणी, गॅस शेगडीच्या किंमतीवर मोठी सूट

वृत्तसंस्था

Feb 03,2019 10:24:00 AM IST

नागपूर- अलीकडेच साजरा झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त हिंदवेअरच्या वतीने किचन चिमणी, गॅस शेगडी आदींच्या शानदार रेंजवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे स्वयंपाकघराला अत्याधुनिक उपकरणाने सजवण्याची ही चांगली संधी ठरत आहे. यानिमित्त सुरू करण्यात आलेली ही ऑफर सध्याही सुरूच आहे. बाथरूम तसेच किचन उपकरणावर कॉम्बो ऑफरचाही लाभ घेता येतो.

या कॉम्बो ऑफर्समध्ये क्लिओ हॅक ब्लॅक-६० किचन चिमणी आणि तीन बर्नरची ऐला ३-बी गॅस कुकटॉप शेगडी केवळ २६,९९० रुपयांत उपलब्ध आहे. त्याच बरोबर २४,९९० रुपये किंमत असलेली एलिशिया-६० किचन चिमणी १४,९९९ रुपयात आणि लारा निओ-६० चिमणी १०,९९० रुपयांत मिळत आहे.

या अंतर्गत हिंदवेअरच्या सर्व किचन रेंजवर सुपर सेव्हर ऑफर दिली जात आहे. यामध्ये कुकर हुड्स, बिल्ट-इन हॉब्स, बिल्ड-इन ओव्हन, बिल्ट-इन मायक्रोवेव्ह ओव्हन, डिश वॉशर, इंडक्शन कुक टॉप, फूड वेस्ट डिस्पोझर आणि किचन सिंक आदी उपकरणांवर आकर्षित सूट उपलब्ध आहे.

हिंदवेअरच्या एक्सक्लुझिव्ह गॅलरी तसेच अधिकृत डीलर नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, पुसद, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर तसेच शिर्डीमध्ये उपलब्ध आहे.

X
COMMENT