Home | Khabrein Jara Hat Ke | greece woman in very poor condition

एका सँडविचचे आमिष दाखवून येथे महिलांकडून करून घेतले जाते वाईट काम, पोटासाठी त्याही होतात तयार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 09, 2018, 12:01 AM IST

येथे केवळ एका सँडविचचे आमिष दाखवून भुकेने व्याकुळ झालेल्या महिलांकडून करून घेतले जाते वाईट काम, जगण्यासाठी या महिलाही हो

  • greece woman in very poor condition

    मानव असो वा प्राणी पोटाच्या भुकेपुढे सर्वच विवश आहेत. स्वतःची भूक भागवण्यासाठी व्यक्ती कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. जिवंत राहण्यासाठी काहीही करतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेविषयी सांगत आहोत, जेथे भुकेने पीडित असलेल्या महिलांची अवस्था पाहून कोणाचेही डोळे भरून येतील. येथे केवळ एका सँडविचचे आमिष दाखवून भुकेने व्याकुळ झालेल्या महिलांकडून वाईट काम करून घेतले जाते.


    आम्ही येथे तुम्हाला ग्रीस देशाविषयी सांगत आहोत. येथे वेश्या व्यवसाय सर्वात जास्त प्रमाणात चालतो. काही काळापूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार देह व्यापारात ग्रीसच्या महिला सर्वात पुढे आहेत. ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये स्थित पेंटियोन युनिव्हर्सिटीतील समाजशास्त्रचे प्रोफेसर ग्रेगोरी लॅक्सोस आणि त्यांच्या टीमने मिळून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेचे आकडे चकित करणारे होते.


    येथे या कामासाठी बहुतांश 17 ते 20 वर्षांच्या मुलींचा वापर केला जातो. येथे या मुलींना 50 युरो देऊन किंवा फक्त एका सँडविचचे आमिष दाखवून त्यांचे शारीरिक शोषण केले जाते. येथील परिस्थितीचा विचार केल्यास ही गंभीर चिंतेची बाब आहे.

Trending