आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालच है ये जान मेरी, इश्क नहीं जो छूटेगा

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 'इतना भी क्या पढ़ना फूंक किताबों को'

इतना भी क्या पढ़ना फूंक किताबों को अपने होने पे ही जो शक हो जाए नमक नहीं है यार तबियत है मेरी ये क्यों सबके स्वाद मुताबिक़ हो जाए एखाद्या व्यक्तीस पूरक किंवा अनुरूप हाेणं किंबहुना असणं हे अतिशय कठीण असते. जेव्हा स्वत:त थाेडाफार अात्मविश्वास असताे त्या वेळी तर अधिकच कठीण हाेऊन बसते. माझ्याही अगाेदर ही बाब त्या मुलाच्या लक्षात अाली, ज्याच्या प्रेयसीचं नाव मर्जी हाेतं. एक सुंदर शहर हाेतं, तेथे एक कार्यालय अाणि कार्यालयात बऱ्याच काही केबिन हाेत्या. त्यापैकी एका केबिनमध्ये हा तरुण मुलगा बसत असे, त्याच्यासाेबत अाणखी पाच जण शेजारी असत. शाळेच्या घंटीप्रमाणे राेज घडाळ्यात १० वाजले की सारे लाेक अापापल्या डेस्कवर बसत. काेणाचंही एकमेकांशी साम्य नव्हतं, परंतु सारे एकदुसऱ्यासारखेच हाेते. बाेलण्यात, परिस्थितीने अाणि भावनेनेदेखील. तरीही का कळत नव्हतं... प्रत्येक जण केबिनमधल्या दुसऱ्याला रंग, ढंग अाणि प्रसंगानुरूप अापल्याला अनुरूप बनवू पाहत हाेता.  समाेरची व्यक्ती अापल्यासारखंच किंवा अापल्या मर्जीप्रमाणे वागावी, असं अापल्याला का वाटत असतं? अापण शिवी हासडताे तेव्हा समाेरचादेखील शिवी देताे. अापण स्माइल देताे तेव्हा समाेरचाही देताे. जेव्हा अापण बसमध्ये, कार्यालय किंवा घरात अथवा एखाद्या रांगेत शून्यावस्थेत उभे असताे तेव्हा समाेरची व्यक्तीदेखील भावहीन असते. काय, अापण दिवसेंदिवस केवळ प्रतिक्रियावादी हाेत चाललाे अाहाेत? अर्थात, केवळ प्रतिक्रिया देत अाहाेत अापली, काेणत्याही प्रकरणात काहीही ठाेस भूमिका घेत नाहीत. कदाचित कृती करण्यासाठी हिंमत, समज असावी लागते त्यामुळे तसे घडत असावे. अाणि हाेयबा बनण्यासाठी या दाेन्ही बाबींची नक्कीच गरज नसते. केवळ दाेन-तीन वेळ मान तुकवावी लागते अाणि त्यास अापला हाेकार मानला जाताे. ताे पाच जणांच्या शेजारी बसलेला तरुण मुलगा या विचारात गढून गेला हाेता अाणि ते पाचही जण कॅन्टीनमधील चहाचा दर्जा सतत घसरत असल्यामुळे चिंतेत हाेते. काेण, कसा अाणि किती मर्द अाहे हे दाखवून देण्याचे ते शाैकीन हाेते. बाेनसच्या वाढत्या अाकड्यांनी ते अानंदून जात असत. चांगले लाेक हाेते ते. मात्र त्या केबिनमध्ये त्या मुलाशिवाय जे त्यांच्यासारखे, त्यांना पूरक किंबहुना अनुरूप असा काेणीही नव्हता अाणि तसे हाेण्याची काेणाची इच्छा नव्हती. या सर्वांवर लहान अाणि माेठा असे दाेन मॅनेजर हाेते. हे मॅनेजर या पाचही जणांच्या मेंदूत काही खऱ्या, काही खाेट्या गाेष्टी भरवत. कधी कधी मॅनेजर एखाद्यास इतके उचकवत असे की, एखादा कर्मचारी जणू बाेलका राघू बनून सहकाऱ्यांची गाेपनीय माहिती पाेहाेचवायचा. मॅनेजरच्या अशा भूमिकेने त्या केबिनमधल्या लाेकांत अापसात भांडणे हाेत. शिवीगाळ व्हायची. सारी माहिती काेण मॅनेजरपर्यंत पाेहाेचवताे ते कळत नसे. एक दिवस अचानक त्या मुलाचा शाेध लागला जाे मॅनेजरला माहिती द्यायचा. त्याचे नाव, लाेभ! हाच लाेभ राेज-राेज हळूहळू अापल्यातील खरा माणूस मारताे अाहे. हीच ती दाेरी अाहे, ज्यामुळे केवळ अापले हातपाय बांधले गेले असेच नव्हे, तर विवेक अाणि मनालादेखील जखडून टाकले अाहे. हा लाेभ कधी सहानुभूतीचे  प्रेम अाणि कधी राष्ट्रभक्तीचे रूप घेऊन येताे. अाज जेव्हा मी त्या तरुण मुलाच्या बाबत विचार करीत हाेताे तेव्हा मला सारे कळले. ते सुंदर शहर माझा हिंदुस्थान हाेता. त्या कार्यालयातील केबिन म्हणजे एक-एक राजधानी हाेती अाणि गाेपनीय माहिती देणारा राजकारणाचा भाऊ लाेभी हाेता. मत पनपने देना अपने अंदर, इस लालच के दीमक को मेरे दोस्त।  ये खा लेगा तुम्हारा इनसान और इमान। ये बिगाड़ सकता है तुम्हारी साख। कर सकता है तुम्हारे सपनों को राख। तुम्हारे पंख कतरेगा, ये रिश्ते तोड़ डालेगा। तुम्हारी सीधी राहों में भंवर से मोड़ डालेगा। तुम्हें मुश्किल में डाल के ये खुद मुस्कुरायेगा।  हमेशा की तरह ये जरूरत के कपड़े पहन कर आएगा।  हाच लाेभ अाहे, जाे अापणास इतरांसारखे हाेण्यास भाग पाडताे. इतरांप्रमाणे चालायला लावताे. लाेभी हाेऊन जिंकण्यापेक्षाही दिलदार हाेऊन पराभूत हाेणे कदाचित अधिक उत्तम. मला वाटते काही घडवण्याची इच्छा, करून दाखवण्याच्या प्रयत्नालादेखील अातल्या अात लाेभाची वाळवी खाऊन टाकते. जी स्वप्ने तुमची अाहेत, जे मार्ग तुमची वाट पाहत अाहेत, जे-जे नवे सारे केवळ तुमच्यासाठीच घडणार अाहे, त्या साऱ्यांना या लाेभाच्या रूपातील वाळवीच्या हवाली करणे याेग्य नव्हे. कांटा बनके रोजाना आंखों में ही टूटेगा, लालच है ये जान मेरी, इश्क नहीं जो छूटेगा।


कवी अाणि गीतकार  
इर्शाद कामिल
officepost.irshad@gma
il.com

बातम्या आणखी आहेत...