Health / हिरवे बदाम करतात वजन कमी करण्यास मदत

हे बदाम वजन कमी करण्यासाठी चांगले असतात, हे अतिरिक्त चरबीला बाहेर काढण्यास मदत करतात. 

दिव्य मराठी वेब

Aug 13,2019 12:15:00 AM IST

हिरवे बदाम नट्स असून पोषक तत्त्वांनी भरपूर असतात. वाळलेल्या बदामाच्या तुलनेत यात पोषक तत्त्वे जास्त प्रमाणात असतात. काय आहेत याचे फायदे आणि याचे सेवन कसे केले पाहिजे ते जाणून घेऊया...

1. हिरवे बदाम आरोग्यासाठी उत्तम असतात. कारण हे अँटिऑक्सिडंटने भरपूर असतात आणि शरीरातून विषाक्त पदार्थांना बाहेर काढतात. यामुळे रोग-प्रतिरोधक क्षमताही वाढते.


2. हे बदाम वजन कमी करण्यासाठी चांगले असतात, हे अतिरिक्त चरबीला बाहेर काढण्यास मदत करतात.


3. हिरवे बदाम पोटासाठीदेखील चांगले असतात, कारण यात जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचन प्रक्रियेला व्यवस्थित करून बद्धकोष्ठतेला दूर करतात.


4. हे केसांसाठीदेखील फायदेशीर आहे, कारण यात व्हिटॅमिन, खनिज आणि इतर बरीच पोषक तत्त्वे आहेत.


5. हिरवे बदाम फॉलिक अॅसिडचा चांगला स्रोत आहे, जो गर्भाच्या मस्तिष्क आणि न्यूरोलॉजिकल विकासात मदत करतो. यात असणारे व्हिटॅमिन ई मुलांना अस्थमाच्या जोखमीपासून वाचवते.

X
COMMENT