आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूर : उद्यान असलेल्या १० बसेस सुरू, एसीची गरज नाही, इंधनही बचत, मातीचा वापर न करता प्रयोग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूरमध्ये आशियातील पहिली ग्रीन रूफटॉप असलेल्या बसेसची सेवा सुरू झाली आहे. गार्डन ऑन द मूव्ह मोहिमेअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.  या बसच्या छतावर १.८ बाय १.५ चे दोन ग्रीन पॅनल लावण्यात आले आहेत. सामान्यपणे 
मातीचे पॅनल लावले जातात. त्याचे वजन २५० ते ३०० किलोपर्यंत असते. परंतु या बसेसवर गेयामेटचा वापर करण्यात आला आहे. त्यात मातीऐवजी कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. यात पाणी शोषून घेणारे तंतू असतात. त्याचे वजन ४० किलो आहे. त्याशिवाय जास्त पाणी देण्याचीही गरज नाही. वर्षातून दोन किंवा तीन वेळा देखभालीची गरज भासेल. एका ग्रीन रूफची किंमत १० हजार रुपये आहे. जीडब्ल्यूएस लिव्हिंग आर्ट सिंगापूर ग्रीन बिल्डिंग कौन्सिल व एन.पी. पार्क्सच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प चालवला जात आहे. तूर्त सार्वजनिक वाहतूक सेवेतील १० बसेसवर त्यासाठी ४ लाख रुपये खर्च करून त्यांना ग्रीन करण्यात आले. तीन महिने या प्रकल्पाची निगराणी केली जाईल. मग सुधारणा लक्षात घेऊन ४०० बसेसवर ग्रीन रूफ लावले जातील. 
 

१५ ते २० टक्क्यांनी इंधन बचत
प्रकल्पाचे सल्लागार डॉ. चेन लुआंग यांच्या मते, ग्रीन बसमध्ये वातानुकूलित व्यवस्थेची गरज नाही. म्हणून इंधन कमी लागते. त्यामुळे दिवसभरात एका बसमागे १५ ते २० टक्के इंधनाची बचत होते. 
 

तापमानाचा फरक मोजण्यासाठी सेन्सर
बसच्या छतावर व आतमध्ये सेन्सर लावलेले आहेत. त्यावरून तापमानातील फरक लक्षात घेता येतो. ग्रीन रूफ छतावर ऊन येत नाही. त्यामुळे आतील तापमान बाहेरच्या तुलनेत ५ अंशांनी कमी राहते. 

 

दुष्काळ - वारे सहन करणारे रोपटे
या मॅट्सवर लावलेली रोपटी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे रोपटे दुष्काळ किंवा सोसाट्याच्या वाऱ्याचाही मारा सहन करू शकते. तापमान जास्त असले तरी रोपटे सुकत नाही. पॅनलवर ते वाढवले जाते. नंतर ते बसवर लावले जातात.  
 

इलेक्ट्रिक बससाठी अतिशय लाभदायी
ग्रीन रूफटॉपमुळे इलेक्ट्रिक बसमधील बॅटरीचा वापर कमी होईल. सिंगापूर ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या एका अभ्यासात ही बाब सिद्ध झाली आहे. हे पॅनल लावल्यानंतर बॅटरीचा वापर २५ टक्के कमी होतो. लवकर चार्ज गरजेचा नाही. 

बातम्या आणखी आहेत...