आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणाच्या कुशीत १२ एकरावर तारांकित ग्रेप पार्क; ४५ कोटी खर्चून उभा राहिला प्रकल्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गंगापूर धरणालगत उभारलेल्या तारांकित 'ग्रेप पार्क'चे हे नयनमनाेहर हवाई छायाचित्र टिपलेे अाहे उमेश नागरे यांंनी. सुमारे १२ एकरात साकारलेल्या या देखण्या, अालिशान अाणि निसर्गरम्य प्रकल्पाकडे जगभरातील पर्यटकांची पावले वळली नाही तरच नवल... 

 

नाशिक- धार्मिक वारसा लाभलेल्या नाशिकची आता यंत्रभूमीपाठाेपाठ वायनरीमुळे निर्माण होणारी नवी अाेळख लक्षात घेऊन देशी-विदेशी पर्यटकांना अाकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला अाहे. सुखद हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक परिसरामध्ये निसर्गाच्या सहवासात आनंदाचे चार क्षण घालविता यावे म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गंगापूर धरणालगत सुमारे ४५ काेटी रुपये खर्चून तारांकित 'ग्रेप पार्क' उभारला अाहे. सुमारे २२ एकराच्या जागेतील १२ एकरात हा भव्य व अालिशान प्रकल्प उभारण्यात अाला अाहे. 


नाशिकची जगभरात अाेळख निर्माण करणारी 'द्राक्षे' हीच या प्रकल्पामागील 'थीम' अाहे. त्यामुळेच या पार्कमधील कक्षांना द्राक्षांच्या विविध जातींची नावे देण्यात अाली अाहेत. अनाबेशाही, थाॅमसन, शिराज, क्रिमसन, मरलाॅट अशा वैशिष्ट्यपूर्ण नावांच्या कक्षातील रहिवासाच्या मधुर अाठवणी घेऊनच पर्यटक येथून परत जातील. या प्रकल्पाच्या उभारणीत तत्कालीन उपमुख्यमंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विशेष लक्ष घातल्याने त्यांच्या काळात वेळाेवेळी सुमारे ५० ते ६० टक्के निधी उपलब्ध झाला. त्यानंतर विद्यमान पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनीही निधी पुरवल्याने हा प्रकल्प सहजतेने अाणि वेगाने पूर्णत्वाकडे गेला. पूर्ण प्रकल्पातील पाणी एका ठिकाणी साठवून प्रक्रिया करीत तेथील वृक्ष अाणि हिरवळीसाठी वापरले जाणार अाहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थाने सहसा शहरापासून दूर असतात. परंतु, ग्रेप पार्क शहरापासून अवघ्या १५ किलाेमीटरवर अाहे. हा प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन मुंडावरे व उपअभियंता महेश बागूल यांचे माेठे याेगदान लाभले अाहे.

 
पर्यटनामुळे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक विकास होण्याबरोबरच पर्यटनस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानातही माेठा बदल घडून येतो. पर्यटकाला आवश्यक निवास, भोजन, वाहतूक, माहिती, मनोरंजन आदी व्यवस्थेसोबतच त्या भागातील उत्पादनांनाही मागणी निर्माण होते. त्यामुळे पर्यटन विकासात नागरिकांचा जेवढा सहभाग वाढेल, तेवढीच त्या भागातील अर्थकारणालाही गती मिळते. म्हणूनच शहरालगत हा प्रकल्प साकारण्यात अाला अाहे. 

 

ही अाहेत ग्रेप पार्कची वैशिष्ट्ये 
- पर्यटक निवासाच्या मुख्य इमारतीत २८ कक्ष व रेस्टाॅरंट 
- ट्विन व्हिलाच्या चार इमारती 
- स्वीमिंग पूल 
- संपूर्ण प्रकल्पामध्ये अंतर्गत विद्युतीकरण अाणि वातानुकूलिकरण 
- ग्रेप पार्क व साहसी क्रीडा संकुलाला बाह्य विद्युतीकरण 
- बागबगिचा, लॅण्डस्केप, ट्री प्लॅन्टेशन 
- पर्यटन विकास महामंडळाचा नेचर्स बाेटक्लब 
- साहसी क्रीडा संकुल व कन्व्हेंशन सेंटर 
- माहिती-तंत्रज्ञान सुविधा 


ग्रेप पार्क लवकरच पर्यटकांच्या सेवेत 
ग्रेप पार्क हा तारांकित सुविधा असलेला एमटीडीसीचा रिसाॅर्ट लवकरच महामंडळामार्फत पर्यटकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार अाहे. यामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळेल. नेचर बाेटक्लबदेखील लवकरच सुरू करण्यात येणार अाहे. 
- नितीन मुंडावरे, प्रादेशिक अधिकारी, पर्यटन विकास महामंडळ, 

 

पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर सजावट 
ग्रेप पार्क रिसाॅर्टची अंतर्गत सजावट पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर करायची होती. त्यामुळे प्रकल्पातील सर्वच वस्तूंची सजावट त्या दृष्टीनेच करण्यात आली आहे. सर्व कामात ताेच दर्जा राखण्यात अाला अाहे.

- आशिष चांडक, संचालक, स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर 

 

बातम्या आणखी आहेत...