आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कब्रस्तानात नटलेली नवरी पाहून सर्वांनाच बसला धक्का, कारण समोर आले तेव्हा प्रत्येकाचे डोळे पाणावले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही स्टोरी 'सोशल व्हायरल सिरीझ' अंतर्गत आहे. सोशल मीडियावर अशा काही स्टोरीज व्हायरल होतात, ज्याबद्दल जाणून घ्यायला हवे.)

 

लुगुटी - अमेरिकेतील इंडियाना प्रांतात नुकतेच एक नटलेली तरुणी अगदी नव-वधूच्या पोशाखात पाहून सगळेच हैराण झाले. ही वधू एका कब्रीजवळ थांबून फोटो सेशन करत होती. लोकांनी तिच्या जवळ जाऊन नेमके चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच अतिशय भावूक कारण समोर आले. ज्या दिवशी ही तरुणी कब्रस्तानात पोहोचली त्याच दिवशी तिचा विवाह निश्चित करण्यात आला होता. परंतु, नवरदेव तिच्यासोबत येऊ शकला नाही. काही महिन्यांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता. परंतु, लग्नाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी तिच्या भावी पतीचा अपघाती मृत्यू झाला. ती ज्या कबरीजवळ रडत होती ती त्याच नवरदेवाची होती. त्यामुळे, आपल्या लग्नाचा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी ती कब्रस्तानात पोहोचली होती. 


फोटोग्राफरही केला हायर
- ही स्टोरी लुगुटी शहरातील जेसिका पेगेट हिची आहे. 29 सप्टेंबर रोजी तिचे लग्न केंडल मर्फीसोबत ठरले होते. परंतु, 10 नोव्हेंबर 2017 रोजी मद्यधुंद अवस्थेत ड्राइव्ह करताना त्याची कार ट्रकला धडकली. यात मर्फीचा जागीच मृत्यू झाला. 
- या कपलने आपली शॉपिंग सुद्धा आटोपली होती. फोटोशूटसाठी एक प्रोफेशनल सुद्धा निवडला होता. परंतु, अचानक मर्फीचा मृत्यू झाल्याने जेसिकाचे स्वप्न भंगले. लग्नाची तारीख जवळ आली तेव्हा जेसिकाने फोटोग्राफरला फोन करून बुकिंग कॅन्सल न करण्यास सांगितले. 29 सप्टेंबरला ठरल्याप्रमाणे तुला फोटो सेशन करावा लागेल असेही स्पष्ट केले. 
- मर्फीच्या मृत्यूच्या 10 महिन्यानंतर जेसिका फोटोग्राफरला घेऊन कब्रस्तानात पोहोचली. लग्नाच्या वेशात सजलेल्या जेसिकाने आपल्या पतीच्या कबरीसमोर फोटोसेशन केले. 


नवदेवाच्या बूटांमध्ये फुले घेऊन पोहोचली...
केंडलने आपल्या प्रियकराच्या कबरीवर पूर्णपणे नववधूच्या पोशाखात फोटोसेशन केले. ती अगदी एका वधूच्या अवतारात आली होती. एवढेच नव्हे, तिच्या प्रियकराने जो बूट लग्नात घालण्यासाठी खरेदी केला होता. तो सुद्धा जेसिकाने आणला होता. जेसिकाने यात फुले ठेवून त्यासोबत काही छायाचित्रे टिपली. कित्येक दिवसांपासून ती यासाठी प्लॅनिंग करत होती. परंतु, प्रत्यक्षात तो दिवस आला तेव्हा आपण कबरीसमोर बसून इतके रडणार याचा विचारच जेसिकाने केला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...