आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराणा दुकानदार करू शकतील इलेक्ट्रिक बॅटरी स्वॅपिंग व्यवसाय; २ चार्ज बॅटरीद्वारे सुरू हाेईल सेंटर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - किराणा दुकानदारांसाठी एक चांगली बातमी आहे.हे व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन म्हणून काम करू शकतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधांच्या धाेरणामध्ये अशा प्रकारची घाेषणा हाेण्याची शक्यता आहे. या व्यवसायासाठी किराणा दुकानांना काेणताही परवान्याची गरज भासणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन अनेक प्रकारचे असू शकतात. एक माेठे स्टेशन पेट्राेल पंपसारख्या ठिकाणी असेल. जेथे माेठ्या प्रमाणावर बॅटरी स्वॅपिंग सुविधा असेल. त्याचप्रमाणे किराणा नुकानांमध्ये दाेन चार्ज झालेल्या बॅटरी ठेवून बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू केले जाऊ शकते. दुचाकीस्वार आपली बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर किराणा दुकानातून चार्ज झालेल्या बॅटरी घेऊ शकतील आणि त्याबदल्यात त्यांना किराणावाल्याला शुल्क द्यावे लागेल. एसएमआयव्हीच्या म्हणण्यानुसार या कामासाठी अनेक स्टार्टअप कंपन्या प्रयत्न करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, किराणा दुकानात चार्ज बॅटरी मिळाल्यास दुचाकीस्वारांना चिंता राहणार नाही. किराणा दुकानदार केवळ ३० हजार रुपये खर्च करून दुचाकींसाठी हा व्यवसाय सुरू करू शकतात. एका बॅटरीची किंमत अंदाजे १५ हजार रुपये आहे.


१०० कि.मी.वर  चार्जिंग स्टेशन
महामार्गावर प्रत्येक १०० किलाेमीटरच्या अंतरावर एक फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येतील. पुढील वर्षभरात माेठ्या शहरात २,७०० चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची याेजना आखण्यात येत आहे.  २०१६ पासून देशात इलेक्ट्रीक वाहनांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु त्याला  पहिजे त्या प्रमाणात यश मिळालेले नाही. ग्लाेबल आयव्ही २०१९च्या आकडेवारीनुसार २०१८-१९ वर्षात भारतात  एक लाख इलेक्ट्रिक दुचाकींचे उत्पादन झाले. चीनमध्ये ही संख्या २.६ काेटी हाेती.

बातम्या आणखी आहेत...