आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नामध्ये नवरदेवाच्या कृत्याने वधू झाली नाराज, चिडलेल्या लोकांनी नवरदेवाचे केले अर्धे मुंडन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - निकाहला नकार दिल्यामुळे नवरीमुलीकडच्या लोकांनी नवरदेवासहित तर चार लोकांचे अर्धे-अर्धे मुंडन केले. असे करण्यामागचे कारण म्हणजे, नवरदेवाला देण्यात आलेली बाईक आवडली नाही, यामुळे नवरदेव आणि त्याच्या भावांनी लग्न करण्यास नकार दिला. वरपक्षाचे लोक पल्सर नाही तर अपाचे गाडीसाठी आडून बसले. त्यानंतर चार सोन्याचे तोळ्यांचे लॉकेटही करा अशी डिमांड केली. वाढत्या मागण्या पाहून वधूपक्षातील लोकांचा संयम सुटला आणि त्यांनी नवरदेव तसेच वऱ्हाडाला बंधक बनवले. या दरम्यान मुलाकडाच्या एका व्यक्तीने 100 नंबर डायल करून पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्वांना घेऊन इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये आले.


- हे प्रकरण खुर्रमनगर येथील जियाउल हाक पार्क भागातील आहे. मुलीचे वडील बाराबंकी येथील राहणारे आहेत. भाजी विकून ते आपले घर चालवतात.
- पार्कजवळचे त्यांचे छोटेसे घर आहे. त्यांनी सांगितले की, तीन महिन्यापूर्वी बाराबंकी येथीलच धौकलपुरवा येथे राहणारे अब्दुल कलाम यांच्या घरात मुलीचे लग्न ठरले होते.
- एक महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला. लग्नासाठी ऐपतीप्रमाणे सर्व जमवाजमव केली. परंतु लग्नाच्या सात दिवसांपूर्वी मुलाकडच्या लोकांनी मागण्या वाढवण्यास सुरुवात केली.
- रविवारी लग्नासाठी नवरदेव जवळपास दीडशे लोकांचे वऱ्हाड घेऊन खुर्रमनगर येथे पोहोचले. काझीही आले होते. परंतु लग्नाच्या काही वेळापूर्वी हुंड्यातील वस्तू पाहून नवरदेवाने लग्नासाठी नकार दिला.
- मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे सांगितल्यानंतर, नवरदेवाने लग्न न करता वऱ्हाड परत घेऊन जाण्याची धमकी दिली. नवरदेवाचे हे कृत्य पाहून मुलगीही नाराज झाली.


मेहरमध्ये 25 हजार देण्यासही तयार झाले नाहीत 
- वधूपक्षाच्या लोकांनी वधूसाठी 25 हजार रुपये मेहर निश्चित केली होती. परंतु निकाहनाम्यातून ही अट काढून टाकावी अशी वरपक्षाची मागणी होती.
- मुलीची वडील म्हणाले की, आम्ही तीन-चार लाख रुपये हुंडा देत आहोत तर 25 हजार यापुढे काहीच नाहीत. परंतु नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी नशेमध्ये गोंधळ करू लागले.
- मुलीच्या वडिलांनी हेसुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न केला की, 85 हजार रुपये खर्च करून खरेदी केलेली बाईक परत करून दुसरी घेऊन येणे शक्य नाही. ज्या बाईकची तुम्ही डिमांड करत आहात ती यापेक्षा केवळ 10 हजारांनी महाग आहे. यामुळे अशा क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही लग्नाला नकार देऊ नका. परंतु नवरदेव लग्नासाठी तयार झाला नाही.


मग शिकवला चांगलाच धडा
- खूप मनधरणी करूनही मुलाकडचे लोक तयार होत नाहीत हे पाहून मुलीकडच्या लोकांनी नवरदेव आणि संपूर्ण वऱ्हाडाला बंधक बनवले.
- या दरम्यान काही लोक वस्तरा घेऊन आले आणि नवरदेवासहित इतर चार लोकांचे सर्वांसमोर अर्धे मुंडन केले.
- घटनास्थळी पोहोचलेला पोलिसांनी लोकांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु लोक खूप रागात होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढत सर्व वऱ्हाडाला आणि मुलीकडच्या लोकांना इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये आणले.
- सर्वांनी समजावून सांगितल्यानंतरही नवरदेवाने लग्नासाठी नकारच दिला परंतु यावेळी तो खूप घाबरलेला होता.

बातम्या आणखी आहेत...