Home | National | Madhya Pradesh | groom hit slapped in sister in law Khandwa

सर्वजण पाहत राहिले तमाशा, रिकाम्या हाताने परतले वऱ्हाड

नॅशनल डेस्क | Update - Feb 11, 2019, 03:14 PM IST

मंडपात वधूला पाहताच रागाने लाल झाला नवरदेव, कोणताही विचार न करता वधूच्या बहिणीच्या खाडकन् श्रीमुखात ठेवून दिली, हे दृश्य

  • groom hit slapped in sister in law Khandwa

    हरसूद/खंडवा : रविवार 10 फेब्रुवारी वसंत पंचमीला मांगलिक भवनमध्ये मुख्यमंत्री कन्यादान योजनेच्या अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने वर-वधू पक्षाचे लोक पोहोचले होते. तेवढ्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे सर्व उपस्थित सुन्न झाले. 40 जोडप्यांचे लग्न लावले जाणार होते. लग्नासाठी जोड्या तयार होत होत्या. परंतु एक जोडी तयार नव्हती. कारण वधू पक्षाचे लोक वेळेवर पोहोचलेले नव्हते. उशीरा आलेली वधू आणि तिच्या कुटुंबियांना पाहून नवरदेवाचा राग अनावर झाला आणि त्याने कोणताही विचार न करता वधूच्या बहिणीवर संपूर्ण राग काढला. वधूजवळ उभ्या असलेल्या बहिणीच्या श्रीमुखात ठेवून दिली आणि विचारले- एवढा उशीर का झाला? मुलीला मारलेले पाहून दोन्ही पक्षाचे लोक एकमेकांना भिडले. वाद एवढा वाढला की, लग्न न करताच दोन्ही पक्ष निघून गेले.


    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजता वधू पक्षासोबत वधू ज्योती (शिवपूर) आपल्या कुटुंबियांसोबत विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचली. वधूला पाहताच नवरदेव धर्मेंद्र (पोखरणी) भडकला. वधूजवळ उभ्या असलेल्या बहिणीच्या श्रीमुखात ठेवून विचारले एवढा उशीर का झाला. तेवढ्यात दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांना भिडले. या प्रकरणात सध्या कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. या विवाह सोहळ्यात एकूण 260 मुलींचे लग्न झाले.

Trending