आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासऱ्याकडून 21 लाख रु. घेण्यास नवरदेवाचा नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर   - राजस्थानातील जोधपूरमध्ये एका तरुणास साखरपुड्यात भेट म्हणून २१ लाख रुपये देण्यात येत होते. ती रक्कम मुलीच्या वडिलांना साभार परत करत रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. टिळ्याच्या कार्यक्रमात तरुणाने हात जोडून म्हटले, अशा प्रकारचा  आहेर देण्यात येऊ नये. मला हे ओझे वाटते. अखेर त्याने शुभशकुन म्हणून ११ रुपये आणि नारळ स्वीकारले. 


स्थापत्य अभियंता असलेल्या प्रल्हादसिंह यांचे रावणिया गावातील कृष्णाकुमारीशी लग्न ठरले आहे. प्रल्हादचे आजोबा कॅप्टन किशोरसिंह राठोड लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. सध्या ते खारडा गावचे सरपंच आहेत. त्यांनी सुचवल्यानंतरच प्रल्हाद यांनी आहेर परत केला होता. किशोरसिंह म्हणाले, माझी सून एमबीए अाहे. यापेक्षा मला अधिक काय हवे? हीच खूप मोठी भेट आहे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...