आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तोळे सोने, हनीमून ट्रीपचे पॅकेज आणि विमानाच्या किरायाचे पैसे न दिल्यामुळे लग्नाला गेले नाही वऱ्हाड, अखेर युवतीने उचलले हे पाऊल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - वडोदरा येथील युवकाने हुंडा दिला नाही म्हणून आपले वऱ्हाड वधूकडे नेले नाही. 24 तोळे सोने, हनीमून ट्रिपचे पॅकेज आणि वऱ्हाडी मंडळींसाठी विमानाने ये-जा करण्याचा किरायाचे रूपये न दिल्याने त्याने हे पाऊल उचलले. युवतीने गुरुवारी महिला पोलिस स्टेशनमध्ये नवरदेव विराज जायसवाल, पिता गिरीश जायसवाल, आई चंद्रिका आणि काका राजू यांच्याविरोधात अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ करणे तसेच हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

18 मे ठरवली होती लग्नाची तारीख

युवतीच्या मते, गेल्या वर्षी तिच्या मावशीच्या ओळखीने विराजचे स्थळ आले होते. विराज आणि त्याचे नातेवाईक गेल्या वर्षी तिला पाहण्यासाठी इंदूरला आले होते. त्यांनी 18 मे  2019 ही लग्नाची तारीख ठरवली होती. दरम्यान त्यांनी हुंड्याची मागणी केली. सुरुवातीला वडोदरा येते लग्न होईल असे ठरवले होते पण नंतर आम्ही इंदूरला येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी वऱ्हाडी मंडळींची योग्य ती काळजी घेण्यास सांगितले. अनेक महत्वाचे नातेवाईक विमानाने येणार असल्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च, बस भाड्यासाठी 80 हजार रूपयांची मागणी केली. दरम्यान मी मध्यम वर्गीय गृहस्थ असल्यामुळे इतका खर्च करू शकणार नसल्याचे माझ्या वडिलांनी त्यांनी सांगितले. पण नवरदेवाचे वडील, काका आणि आई आपल्या गोष्टीवर अडून राहिले. काही दिवसांनंतर त्यांनी मला दागिने पसंत करण्यासाठी वडोदरा येथे बोलवले होते.  

 

मुलीच्या मामाकडेही केली हुंड्याची मागणी

मी वडोदराहून परतल्यानंतर विराजच्या वडिलांनी माझ्या मामाकडे मी पसंत केलेल्या दागिन्याची अर्धी किंमत मागितली. ते म्हणाल की, तुमच्या भाचीने 47 तोळे सोन्याचे दागिने पसंत केले आहे. त्यापैकी अर्ध्या 24 तोळ्याचे पैसे (7 लाख 81 हजार रूपये) युवतीच्या वडिलांनी द्यावे अशी त्यांची इच्छा होती. वर आणि वधू हनीमूनसाठी बाहेर गावी जाणार आहेत. यामुळे मुलीचे मामा या नात्याने त्यांच्या फ्लाइटचे भाडे तुम्हाला द्यावे लागणार आहे. विराजच्या वडिलांनी दबाव टाकून मामाकडून 50 हजारांचे तिकीट देखील बुक करून घेतले आहे. 

 

लग्नाच्या दोन अगोदर दिला नकार

युवतीने पुढे बोलतांना सांगतिले की, जेव्हा माझा मावसभाऊ वडोदरा येथे गेला असता, तेव्हा त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून हुंड्याचे पूर्ण सामान मागितले होते. दरम्यान आम्ही इतका हुंडा देण्यास असमर्थ आहोत. तर तुम्ही 18 मे रोजी वऱ्हाड घेऊन या. कारण आता आमच्या अब्रूचा प्रश्न आहे. इकडे आमच्या कुटुंबीयांनी लग्नाची सगळी तयारी केली आहे. पत्रिका देखील वाटण्यात आल्या आहेत. वधूला मेहंदी लावण्यात आली आहे आणि कपडे दागिने देखील आलेले असल्याचे माझ्या वडिलांनी फोन करून सांगितले. पण 16 मे रात्री 10 वाजता आम्ही लग्नासाठी येणार नसल्याचे फोन करून सांगितले. दोन दिवस युवती आणि तिचे कुटुंबीय विराज आणि त्याच्या कुटुंबीयांकडे याचना करत होते. पण अखेर ते वऱ्हाड घेऊन आलेच नाहीत. 
 

बातम्या आणखी आहेत...