आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती 32 वर्षांची अन् तो 21 वर्षांचा... ब्यूटीपार्लरमधून नवरी बाहेर येताच नवरदेवाने दिला जबरदस्त धक्का!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - शहरातील 32 वर्षीय सरकारी शाळेतील शिक्षिका नवरीचा मेकअप करण्यासाठी ब्यूटीपार्लरमध्ये गेली होती. तेवढ्यात 21 वर्षांचा बॉयफ्रेंड लग्नाच्या आधीच पळून गेला. आरोप आहे की बॉयफ्रेंड जसबीरसिंह लग्नाचे आमिष दाखवून संबंध बनवत राहिला. शिक्षिकेच्या तक्रारीवरून जसबीरसिंह विरुद्ध बारादरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

मुलाला पळवून लावल्यामुळे वडिलांनाही बनवले आरोपी
जसबीरला पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी त्याचे वडील लखबीर सिंह यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. टीचरने रेपची तक्रार करून स्वत:चे आक्षेपार्ह फोटोज सादर केले होते, परंतु पोलिसांनी याला रेप मानलेले नाही. सीपींना देण्यात आलेल्या तक्रारीत सरकारी टीचरने म्हटले होते की, आरोपी जसबीरने लग्नाचे आमिष दाखवून तिला फसवले आहे.

 

धोका देऊन दुबईला गेला जसबीर...
दोघांची मैत्री झाली तेव्हा ती 30 वर्षांची होती आणि जसबीर 18 वर्षांचा होता. शिक्षिका म्हणते की, जसबीरसेाबत ती नामदेव चौकाजवळील एका हॉटेलमध्ये थांबली होती. येथे जसबीरने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि म्हणाला की, लवकरच लग्न करीन. ती त्याच्या बोलण्याला भुलली होती. यादरम्यान जसबीर दुबईला गेला होता. शिक्षिकेने जेव्हा जसबीरच्या वडिलांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी तिला धमकावणे सुरू केले. कसेबसे दुबईहून जसबीरला बोलावण्यात आले होते. दोघांना चंदिगडमध्ये कोर्ट मॅरेज करायचे होते. यामुळे दोघेही चंदिगडला गेले. शिक्षिका असलेली महिला नवरीचा मेकअप करण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये गेली होती. ती मेकअप करून बाहेर आली, तर जसबीरने तिला जबरदस्त झटका दिला. जसबीर म्हणाला होता की- तू ब्यूटीपार्लरमध्ये तयार होऊन ये, मी बाहेर वेट करतो. परंतु जेव्हा ती बाहेर निघाली तेव्हा जसबीर तेथून गायब होता. त्याचा फोनही बंद येऊ लागला. 

 

बातम्या आणखी आहेत...