आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्‍या दहा दिवसानंतर उलगडले पत्‍नीचे भयानक रहस्‍य, तरूण गेला डिप्रेशनमध्‍ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- मोठी स्‍वप्‍ने पाहत तरूणाने मुलीला पसंत केले नंतर धुमधडाक्‍यात लग्‍नही केले. अतिशय आनंदात असणा-या या तरूणाच्‍या पायाखालची जमिनच सरकली जेव्‍हा त्‍याला आपल्‍या नववधूचे सत्‍य कळाले. तरूणीचे वास्‍तव कळताच तरूणाला प्रचंड धक्‍का बसला आहे. घटनेनंतर तो प्रचंड डिप्रेशनमध्‍ये गेला आहे. 


काय होते तरूणीचे सत्‍य? 
उत्‍तर प्रदेशमधील आग्र्याची ही घटना आहे. लग्‍नाच्‍या 10 दिवसानंतर तरूणाला आपल्‍या पत्‍नीचे वास्‍तव कळाले. तो सुंदर युवतीला तो आपली पत्‍नी समजत होता वास्‍तवात तो एक किन्‍नर होता. तरूण जगदीशपूरा क्षेत्रात राहणारा असून एका कंपनीत मॅनेजर आहे. मागील वर्षी कानपूरमधील एका तरुणीशी त्‍याचे लग्‍न ठरले. मुलगी पाहण्‍याच्‍या कार्यक्रमात मुलगी काहीही बोलली नव्‍हती. तेव्‍हा मुलीच्‍या कुटुंबीयांनी ती घाबरल्‍याचे कारण समोर केले होते. तसेच मुलगी ही उच्‍च शिक्षित आणि शिक्षिका असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले होते. सुरूवातीला मुलाच्‍या घरच्‍यांना यावर संशय आला होता. मात्र नंतर त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले. नंतर धुमधडाक्‍यात त्‍यांचे लग्‍न झाले व नववधूला सासरच्‍या मंडळींनी घरी आणले. 


मधुच्रंदाच्‍या रात्री केला आजाराचा बहाणा 
लग्‍नानंतर तरूणाला मुलीचे हावभाव काही अजिब वाटले होते. तसेच मधुचंद्राच्‍या रात्रीही आजाराचा बहाणा करत ती वेगळ्या रूममध्‍ये झोपली होती. त्‍याच्‍या दुस-या दिवशी ती नातेवाईकांसोबत माहेरी आली होती. दहा दिवसानंतर तरूण पत्‍नीला घेण्‍यासाठी तिच्‍या घरी गेला. यादरम्‍यान रात्री तो तिच्‍या खोलीत थांबला. तेव्‍हा त्‍याला ही धक्‍कादायक गोष्‍ट समजली की त्‍याची पत्‍नी किन्‍नर आहे. 


डिप्रेशनमध्‍ये गेला तरूण 
ही गोष्‍ट उजेडात आल्‍यानंतर सासरच्‍यांनी किन्‍नर व त्‍याच्‍या कुटुंबीयांवर फसवणुकीचा गुन्‍हा दाखल गेला आहे. याप्रकरणी जगदीशपूरा ठाण्‍यात 12 लोकांविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. या घटनेनंतर तरूण प्रचंड डिप्रेशनमध्‍ये गेला होता. मात्र आता त्‍याची तब्‍येत बरी असल्‍याची माहिती आहे. 
 

 

बातम्या आणखी आहेत...