आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक मुलगा मुख्यमंत्री, दुसरा गृहमंत्री, मुलगी निवडणुकीत, येथे संगमा परिवारच सर्वकाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलाप्रधान मेघालयात सर्वाधिक लोकसंख्या मजुरीवर अवलंबून; पुरुषांबरोबर महिलाही नदीतून काढतात वाळू - Divya Marathi
महिलाप्रधान मेघालयात सर्वाधिक लोकसंख्या मजुरीवर अवलंबून; पुरुषांबरोबर महिलाही नदीतून काढतात वाळू

शिलाँग व तुरा - नारळ आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेले माजी लाेकसभा अध्यक्ष पी.ए.संगमा यांचे घर. अंगणात धान सुकण्यासाठी टाकलेले अाहे. जवळच सुकलेल्या लाकडांचा ढीग पडला अाहे. हा लाेकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग अाहे. कार्यकर्त्यांसाठी येथे जेवण तयार हाेईल. दिवंगत पी.ए.संगमा यांची मुलगी व माजी केंद्रीय मंत्री अगाथा नॅशनल पीपल्स पार्टीकडून (एनपीपी) तुरा मतदारसंघातून निवडणूक लढणार अाहे. त्यांच्यासाठी हा विजय कठीण दिसत नाही. कारण निवडणुकीत मतदार फक्त याच परिवारास अाेळखतात. पी.ए.संगमा चार वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत नऊ वेळा विजयी झाले अाहेत. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा काॅनराड संगमा विजयी झाले. काॅनराड अाता मेघालयाचे मुख्यमंत्री अाहेत. त्यांचे भाऊ जेम्स गृहमंत्री अाहेत. मेघालयात लाेकसभेच्या दाेन जागा अाहेत. पहिली तुरा व दुसरी शिलाँग. शिलाँगमध्ये दहा वर्षांपासून काँग्रेसच निवडून येत अाहे. परंतु यंदा सत्ताधारी एनपीपी सहयोगी पक्षांसह काँग्रेसला पराभूत करण्याच्या तयारीत अाहे. येथे काँग्रेसच्या विराेधात इतर सर्व पक्षांकडून एक उमेदवार असतील.   


गाराे, खासी, जयंतिया हे तीन पहाड असलेल्या मेघालयात गाराे हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय अाहे. गाराे एक जात अाहे. संगमा या जातीचे अाहेत. अगाथा यांच्या घरी भेटलेली एनपीपी कार्यकर्ता मल्लेश्वरी हाजाेंग म्हणाली, ‘अगाथाच लढणार व जिंकणार. अाम्ही तयारी सुरू केली अाहे. प्रचारासाठी रथही तयार अाहे. ’ अगाथा यांची अाई सराेजिनी के यांना विचारल्यावर त्या हसत म्हणाल्या, निवडणुकीत काय हाेणार हे अगाथालाच माहीत. येथे एनपीपी व सहकारी भाजपमध्ये विराेधाभास दिसताे. भाजपच्या जिल्हा शाखेचे सदस्य भूपेन हाजाेंग म्हणतात, अाम्ही राज्य सरकारमध्ये सहभागी असलाे तरी लाेकसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला अाहे.     


शिलाँगमध्ये लढत रोमहर्षक हाेणार अाहे. एनपीपीच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी यूडीपी, पीडीएफ, एचएसपीडीपी व भाजप एकत्र अाल्यास काँग्रेससमाेर माेठे अाव्हान उभे राहू शकते. या लाेकसभा मतदारसंघात ३६ विधानसभा मतदारसंघ येतात. २०१८ मधील निवडणुकीत या पाच पक्षांना २१ तर १ जागा अपक्षाला मिळाली हाेती. मुख्यमंत्री काॅनराड काँग्रेसविराेधात सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत अाहेत.  


मुद्द्यांपासून जागांच्या गणितापर्यंत...
येथे दाेन जागा अाहेत. सहा पक्ष सक्रिय अाहेत. संगमा यांच्या एनपीपीसह पाच पक्ष काँग्रेसच्या विराेधात उतरणार अाहेत. काँग्रेस नागरिकता संशोधन विधेयकाचा मुद्दा मांडण्याची शक्यता अाहे. मुख्यमंत्री कॉनराड यांनी यास विराेध केला अाहे. संगमा काँग्रेसच्या घराणेशाहीचा मुद्दा उचलतील.

बातम्या आणखी आहेत...