Suicide / Go Air विमान कंपनीच्या अधिकाऱ्याने राहत्या घरी घेतला गळफास, वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप

आरोपांची पुष्टी करण्यासाठी ऑडियो क्लिप पोलिसांच्या स्वाधीन
 

दिव्य मराठी वेब टीम

Jun 01,2019 04:50:47 PM IST


नागपूर - येथे गो एअर विमान कंपनीच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुलाचा मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. मुलाकडून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेते होते यामुळे तो नेहमी तणावात राहत असल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले. मंथन चव्हाण असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

मंथन नागपूरच्या चंद्रमा नगरात राहत होता. तो सोनेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गो एअर विमान कंपनीत कमांडिंग ऑफिसरच्या पदावर कार्यरत होता. मंथनने गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

एअरलाइन्सचे अधिकारी मुलाला परेशान करत असल्याचा आरोप मंथनच्या वडिलांनी केला. ते म्हणाले की, सुटी घेण्याबाबत अधिकारी त्याचा फोनवर मानसिकरित्या छळ करत होते. आरोपांची पुष्टी करण्यासाठी वडिलांनी मंथनचा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संवादाची ऑडियो क्लिप पोलिसांकडे दिली आहे. सध्या पोलिसांनी आत्महत्याचे प्रकरण दाखल करून तपास सुरू केला आहे.


एक वर्षापूर्वी एअरलाइन्समध्ये झाला होता रुजू
पोलिसांनुसार, मंथनचे वडील महेंद्र एका खासगी कंपनीत काम करतात आणि आई सुषमा चव्हाण पोलिस विभागाच्या विशेष शाखेत कार्यरत आहेत. मंथन परिवारातील मोठा मुलगा होता. तो एक वर्षापूर्वीच नोकरीवर रुजू झाला होता.

X
COMMENT