आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाच्या धुंदीत दुर्लक्षिलेल्या चुकांचे परिणाम अाता टीम इंडिया भोगतेय! ग्राउंड्समन तुम्मूची तिखट प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या दोन्ही इंग्लंड दौऱ्यांत भारतीय क्रिकेट संघाने निराशाजनक कामगिरी केली होती. यंदा पहिल्या कसोटीत झुंज दिल्यानंतर लॉर्ड््सवर गत दौऱ्यातील विजयाची प्रतीक्षा करणाऱ्या भारतीय क्रिकेटरसिकांना टीम इंडियाने साफ निराश केले आहे. दोन्ही डावांत मिळून केवळ ८२ षटकेच मैदानावर टिकू शकणाऱ्या व दोन्ही डावांत अवघ्या २३७ धावा करणाऱ्या भारतीय संघावर टीकेचे आसूड ओढले जात आहेत. 


अनिल कुंबळेला हटवून रवी शास्त्रीला प्रशिक्षक करण्याच्या कृतीपासून विराट कोहलीच्या चुकीच्या संघ निवडीपर्यंतच्या अनेक घटनांचा समाचार सर्वत्र घेतला जात आहे. ज्या भारतीय संघाने गत दौऱ्यात लॉर्ड््सवर यश पाहिले होते, त्याच संघाच्या लाजिरवाण्या पराभवाचा एक नजीकचा साक्षीदार होता लॉर्ड््सच्या ग्राउंड स्टाफमधला हैदराबादचा भारतीय. 


तुम्मू गेली कित्येक वर्षे तेथे सहायक ग्राउंड्समनची भूमिका वठवत आहे. या वेळी मात्र तो भारतीय संघावर नाराज होता. फाजील आत्मविश्वास त्यांना नडला, असं म्हणत होता. भारतीय संघ कोणत्या विश्वात वावरतो ते कळत नाही. कारण खेळपट्टी टणक होती. फिरकीला सहायक ठरणार नव्हती. डोक्यावर पावसाचे ढग होते. पहिला संपूर्ण दिवस पावसाने वाया गेला होता. नाणेफेक दुसऱ्या दिवशी होणार होती. त्या वेळीही पाऊस होता; त्यानंतरही पावसाचे भाकीत करण्यात आले होते. कसोटीआधी काढलेला संघ बदलण्यासाठी पूर्ण वेळ होता. अशा परिस्थितीत जगातला कोणतही सज्ञान कप्तान, संघ व्यवस्थापन दोन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा आणि त्यासाठी एक मध्यमगती गोलंदाज खेळवण्याचा मूर्खपणा करणार नाही. भारतीय संघाने मात्र संपूर्ण कसोटीवर पावसाची छाया असताना तो मूर्खपणा केला. 


चार वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही 'ग्रीन टॉप' खेळपट्टी दिली तेव्हाही एक भारतीय म्हणून मला वाईट वाटले. मात्र, मी नोकरी करतो. माझा नाइलाज होता. तरीही भारतीय संघाने त्यांचेच डावपेच त्यांच्यावर उलटवून इंग्लंडला हरवल्यामुळे मी खूपच आनंदी होतो. 


रविवारी मात्र मला दु:ख झाले. भारतीय संघासोबत फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यासाठी सहायक प्रशिक्षक आहेत. रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक आहे. संघासोबत फिजिओ, मॅस्युअर, व्हिडिओ अॅनालिस्ट आहेत. असे असतानाही चुका हाेतात. 


काेहलीच सलाइनवर; नंबर वन स्थान गमावले 
कोहलीची पाठदुखीची समस्या गंभीर आहे. काही सामने विश्रांती घेण्यासाठी सोडण्याऐवजी तो सर्वच सामन्यांत खेळतो. त्यासाठी वेदनाशामक इंजेक्शन्स व गोळ्या घेऊन तो मैदानात उतरतो. हे फार काळ टिकणार नाही. यातून त्याला नंबर वन स्थानही गमावावे लागले. 

 

बातम्या आणखी आहेत...