आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाव सोडून जाण्यास नकार दिल्याने आदिवासी भिल्ल कुटुंबाला जबर मारहाण, गावात भिल्ल नको म्हणून दिली होती धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- गाव सोडून जाण्यास नकार दिल्यामुळे सवर्ण समाजाने एका भिल्ल कुटुंबाला अमानुष मारहाण केली आहे. गेवराई तालुक्यातील वंजारवाडी या गावात हा धक्कादायक प्रकार घडला. मारहाणीनंतर पीडित कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दिली, पण तक्रार का दिली म्हणून परत या कुटुंबाला मारहाण झाल्याचेही समोर आले आहे.


पीडित कुटुंबाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करून अटकही केली. दरम्यान, तक्रार का दाखल केली अशी विचारणा करत आरोपींच्या नातेवाईकांनी पीडित कुटुंबाला पुन्हा अमानुष मारहाण केली. मारहाण होत असताना तेथे उपस्थित एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ मोबाईलवर काढला. हाच मारहाणीचा व्हिडीओ आज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.


पीडित आदिवासी भिल्ल कुटुंब सध्या खूप दहशतीत आहे. मीराबाई बरडे यांचे कुटुंब गेवराईतील वंजारवाडी गावात वास्तव्यास आहे, ेगावात भिल्ल समाजाचे एकच घर आहे. गावात भिल्ल नको म्हणून गावातील सरपंच रवी चोरमले यांच्यासह अन्य 4 जणांनी पीडित कुटुंबाला गाव सोडण्याची ताकीद दिली होती. पण, गाव सोडून न गेल्याने सरपंच चोरमले आणि त्याच्या साथीदारांनी बरडे कुटुंबाला बेदम मारहाण केली.