आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

६५ पेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांसाठीही व्यवसाय वाढवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी सायंकाळी इंदोरमध्ये बिझनेस ट्रीपसाठी एका पंचातारांकित हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेलच्या एका मुख्य हॉलमध्ये शहरातील संपन्न कुटुंबातील कॅप्टन भरत टोंग्या यांच्या ७५ व्या वाढदिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सर्व कॉन्फरन्स हॉल एकमेकांना जोडण्यात आले होते, जेणेकरून सर्व कुटुंबांना वावरण्यासाठी भरपूर जागा मिळेल. या कार्यक्रमासाठी बहुतांश निमंत्रित हे सिनियर सिटीझन, सुपर सिनियर सिटीझन श्रेणीतील आणि टोंग्या यांचे मित्र होते. यावेळी मी हॉटेलबाहेर पडत असतानाच अनपेक्षितपणे मलाही या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले कारण आलेल्या पाहुण्यांमध्ये माझे काही मित्रही होते. आग्रह केल्यामुळे थोडा वेळ काढून मग जावे असा विचार मी केला. काही वारिष्ठ लोकांनी माझ्याकडे पाहून स्मित केले. ते आपसात चर्चा करत होते की, “मी या व्यक्तीला ओळखतो पण माहित नाही यांना कोठे पाहिले ते.. “! मला तेथे कोणी परिचय विचारला नाही, थोडया वेळानंतर मी बाहेर पडलो. बाहेर पिक अप अँड ड्रॅाप जागेत बरीच गर्दी होती, कारण पार्टीसाठी बरेच लोक येतच होते. माझ्या टॅक्सीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने मला विचारले की, “ तुमच्याकडे मोबाइल आहे काय”? या प्रश्नाने मी चकित झालो आणि थोडावेळ स्वत:कडे पाहून मी मलाच प्रश्न असा विचारला की, माझ्या कपडयांकडे पाहून लोकांना असे वाटत नाही काय की, यांच्याकडे मोबाइल आहे म्हणून? तथापि, मी त्यांना नम्रतेने होय, असे म्हणालो. तेव्हा त्यांनी एक नंबर मला डायल करायला सांगितला. पण त्यात ९ क्रमांकच होते. त्यानंतर पुन्हा एक नंबर दिला, ज्यात अकरा नंबर होते. त्यामुळे तो नंबर लागलाच नाही. आम्हाला तशा अवघडलेल्या अवस्थेत पाहून कार पार्किंग सिक्युरिटीचा माणूस तेथे आला आणि कारण विचारू लागला. ती वृद्ध व्यक्ती म्हणाली की, “मी माझा मोबाइल मोटारीत विसरलो आहे आणि मला ड्रायव्हरचा मोबाइल नंबर आणि कारचा नंबरही आता आठवेना.” पण त्यांनी मला त्यांच्या घरचा लँडलाइन नंबर दिला. पण त्यातही एक घोळ होता. इंदोरचा एसटीडी कोड ०७३१ आहे हे मला माहित होते पण लँडलाइन नंबरच्या मागे दोन लावायचे आहे हे माझ्या उशिरा ध्यानात आले. मी तो जोडल्यानंतरच हा क्रमांक मग वाजू लागला, त्या वृद्धाच्या पत्नीने तो उचलला , तिने ड्रायव्हरला मोबाइल लावला आणि मग सगळे काही जुळून आले. मी हॉटेलातून बाहेर पडलो आणि मध्यरात्री आलो. कारण आमच्या समूहाव्दारा आयोजित “अभिव्यक्ति गरबा महोत्सव” (जो पाच दिवस पुढे वाढविण्यात आला होता) मध्ये सामील व्हायचे होते. हॉटेलात पोहोचल्यानंतर मी सुरक्षारक्षकाला विचारले की, “ मी सायंकाळी फोन नंबरमुळे जसा अडचणीत सापडलो होतो, तसा प्रॉब्लेम आणखी किती जणांना आला? “ त्याने उत्तर दिले, “सर, चार लोकांना” या माहितीमुळे मला २०१८ ची एक घटना आठवली. त्यात असे सांगितले गेले होते की, इतिहासात पहिल्यांदा असे झाले आहे की, जगात ६५ किंवा त्यापेक्षा जास्त वय झालेल्या लोकांची संख्या, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या संख्येपेक्षा जास्त झालेली आहे. 

फंडा असा : भविष्यातील उद्योग जगताने आपल्या कक्षा रूंदावल्या पाहिजेत आणि वाढत्या वयाच्या या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता सदभावनेसह केली पाहिजे.