आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास दर घसरून 5% झाला, 6 वर्षांतील नीचांक, 75% रोजगार देणाऱ्या 4 क्षेत्रांत घट; 2006 नंतर प्रथमच अशी स्थिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून ) मध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी विकास दर घटून ५% वर आला आहे. मागील तिमाहीत हा दर ५.८% होता. तर मागील आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत हा दर ८% होता. सर्वाधिक ९५% घसरण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातून आली आहे. मॅन्युफॅक्चरिंगसह ७५% नोकऱ्या देणाऱ्या रिअल इस्टेट, बांधकाम आणि कृषी क्षेत्रातही घसरण नोंद झाली आहे. जीडीपीचा गेल्या ६ वर्षांतील हा सर्वात कमी दर आहे. यापूर्वी २०१३ च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत जीडीपी विकास दर ४.३ % होता. विकास दरातील ही घसरण सलग १८ महिन्यांपासून सुरू आहे. यापूर्वी अशी स्थिती २००६ मध्ये होती. जुलैमध्ये सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात हा दर ७ % राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर रिझर्व्ह बँकेने हा दर ६.९% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. जीडीपीच्या घसरणीबाबत मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम म्हणाले की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कारणांमुळे ही घट झाली आहे. आर्थिक विकास दर वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. लवकरच स्थिती सुधारेल. 
 

2018च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ३% विकास कमी 
यापूर्वी २०१३च्या जानेवारी-मार्च तिमाहीत विकास दर ४.३% पर्यंत कमी झाला होता. 
गेल्या तिमाहीच्या तुलनेतही विकास दर ०.८% कमी. 
8.1% - जाने.-मार्च 2018 
8% - एप्रिल-जून 2018 
7% - जीडीपी ग्रोथ रेट जुलै-सप्टें. 2018 
6.6% - ऑक्टो.-डिसें. 2018 
5.8% - जाने.-मार्च 2019
5% - एप्रिल-जून 2019 
 

अर्थव्यवस्थेचा पाया असलेल्या ६ पैकी ५ क्षेत्रांत घसरण 
मॅन्युफॅक्चरिंग: 12.1% वरून 0.6% 
२०१८च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ११.५% कमी. गेल्या तिमाहीत ३.१% होता. 
का?: ऑटो विक्री १९ वर्षांत नीचांकी. 
परिणाम: मागणी वाढली नाही तर लाखो रोजगार धोक्यात. अनेक कारखाने बंद होतील. 
 

कृषी क्षेत्र: 5.1% वरून 2% 
३.१% घसरण. गेल्या तिमाहीत -०.१% होती. 
का?: हवामान व नव्या सुधारणांचा अभाव. 
परिणाम: कृषी उत्पादन घटेल. महागाई वाढेल. ग्रामीण भागातून मागणी कमी होऊ शकते. याचा मॅन्युफॅक्चरिंगवर परिणाम. 
 

बांधकाम : 9.6% वरून 5.7% 
३.९% कमी. गेल्या तिमाहीत ७.१% होता. 
का?: सरकारी, खासगी बांधकामे थांबली. 
परिणाम: सिमेंट, गज, वाळूसारख्या वस्तूंची मागणी घटेल. याचा कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होईल. 
 

रिअल इस्टेट : 6.5% वरून 5.9% 
०.६% अिधक. गेल्या तिमाहीत ९.५% होता. 
का?: घरांची विक्री थांबली, कर्जाची मागणी कमी झाली. एनबीएफसी संकट कायम. 
परिणाम: घरांची विक्री अशीच कमी राहू शकते. आर्थिक क्षेत्रावर वाईट परिणाम होईल. 
 

व्यापार, हॉटेल, ट्रान्सपोर्ट: 7.8% वरून 7.1% 
०.७% कमी. गेल्या तिमाहीत ६% होता. 
का?: पर्यटन घटले, हॉटेल बुकिंग कमी. देशांतर्गत प्रवाशांमध्येही घट. 
परिणाम: अर्थव्यवस्थेत ५४% वाटा सेवा क्षेत्राचा. यात रोजगार कमी होण्याची शक्यता. 
 

खाण: 0.4% ने वाढून 2.7% झाला. 
2.3% अधिक. गेल्या तिमाहीत 4.2% होता. 
का?: कोळसा उत्पादन सलग वाढत आहे. 
परिणाम: खाणकाम वाढले तर रोजगारही वाढेल. सरकारने १००% एफडीआय मंजूर केला आहे. त्याचा परिणाम दिसेल. 
 

विलीन बँकांच्या ग्राहकांवर परिणाम, ग्राहकांना नवा खाते क्रमांक, चेकबुक मिळेल (Q&A) 
- आता नवा खाते क्रमांक मिळेल काय ? 
विलीनीकरण झालेल्या बँकांचे खाते क्रमांक योग्य अंकांची व्यवस्था असेल तर खाते क्रमांक शक्यतो बदलणार नाहीत. आयएफएससी कोड बदलेल. 
- चेकबुक, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड बदलेल का ? 
चेकबुक बदलेल. मात्र, तत्काळ नाही. सहा महिने मुदत मिळेल. डेबिट कार्ड बदलणार नाहीत. 
- या बदलानंतर ग्राहकांना अाणखी काय करावे लागेल ? 
नवा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड प्राप्तिकर, विमा कंपनी, म्युच्युअल फंड आदींसह सर्व ठिकाणी नवी नोंद करावी लागेल. एसआयपी आणि ईएमआयसाठी नवी माहिती द्यावी लागेल. 
- व्याजदर एकच राहतील का ? 
जुन्या ग्राहकांच्या एफडी-आरडी व्याजदरांत काही फरक पडणार नाही. नव्या ग्राहकांसाठी व्याजदर एकच असतील. कर्ज खात्यात जुन्या ग्राहकांसाठी काहीच बदल होणार नाही. 
शाखा बदलणार का ? 
काही शाखा बंद होऊ शकतात. विलीन होणाऱ्या बँकांच्या एकाच शहरात एकमेकाजवळ शाखा असतील तर त्या एकत्र केल्या जाऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...