आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबर-मार्चच्या सहामाहीत विकास दर चांगला राहील : कुमार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी रिझर्व्ह बँकेद्वारे प्रमुख व्याजदरात पाव टक्के कपात करण्याच्या निर्णयाची प्रशंसा केली आहे. सरकारने नुकतेच आर्थिक उपायांसाठी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर चांगला राहील,असे त्यांनी सांगितले.
 

कुमार म्हणाले, रिझर्व्ह बँकेने चांगले काम केले आहे. यामुळे सरकारने आधीच उचललेल्या नव्या पावलांना पूर्णपणे प्रोत्साहन मिळेल. रेपो दरात कपातीच्या सरकारच्या निर्णयामुळे सणाच्या हंगामात ग्राहकी वाढेल. सरकारी विचार मंच नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात कपात करणे आणि सरकारद्वारे केलेल्या वित्तीय उपायांमुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही(ऑक्टोबर- मार्च)दरम्यान आर्थिक विकास दर चांगला राहू शकतो. कुमार म्हणाले, रेपो दरात केलेली कपात आणि सरकारकडून केलेल्या वित्तीय उपायांमुळे निश्चित दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेचा विकास दर अंदाजा(चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नोंदलेला ५%)पेक्षा जास्त राहू शकतो. दुसऱ्या सहामाहीत आर्थिक विकास दराबाबत बोलायचे झाल्यास रिझर्व्ह बँकेने अनुक्रमे ६.६% आणि ७.२% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मला वाटते, तो जास्त राहू शकतो.
 

तूट चिंतेचा विषय नाही, सरकारकडे उपाय : 
कुमार यांनी सांगितले की, दुसऱ्या सहामाहीत विकास दराचा अंदाज जास्त राहिल्यास त्यातून वर्षभरात आर्थिक विकास दरात आलेल्या घटीची भरपाई होईल. रिझर्व्ह बँकेने या वर्षासाठी विकास अंदाज ६.९% वरून घटून ६.१% केला आहे. महसुली तूट वास्तवात चिंतेचा विषय नसल्याचे कुमार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...