आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रावरची स्वारी होणार सोपी: जीएसएलव्ही मार्क3 -डी 2 रॉकेट लाँच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीहरिकोटा - इस्रोने बुधवारी आंध्रातील श्रीहरिकोटाहून सायंकाळी ५.०८ वाजता देशातील सर्वात वजनदार रॉकेट जीएसएलव्ही मार्क३-डी२ लाँच केले. जीसॅट-२९ उपग्रह घेऊन हे रॉकेट झेपावले. १६ मिनिटांत उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत दाखल झाला. जीसॅट-२९चे वजन ३,४२३ किलो असून यात आधुनिक ट्रान्सपाँडर्स आहेत. यामुळे दुर्गम भागांत इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. चांद्रयान-२साठीही हे रॉकेट उपयोगी ठरेल. शिवाय, प्रवाशांना अवकाशात घेऊन जाण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे.  

 

४ टनांचे उपग्रह नेण्याची क्षमता : जीएसएलव्ही मार्क३-डी२चे वजन ६४० टन तर उंची ४३.२ मी. आहे. सोबत ४ टनांचा उपग्रह वाहून नेण्याची क्षमता. यात तीन इंजिन असून श्रीहरिकोटाहून ही ६७ वी तर इस्रोची ३३ वी उपग्रह मोहीम आहे. 

बातम्या आणखी आहेत...