आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • GST : Modi Government Planning To Introduce Lottery Offers Under The GST To Encourage Customers To Take Bills

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शॉपिंग केल्यानंतर निश्चितपणे बिल मागा, यामुळे 10 लाख ते 1 कोटी रुपयांच्या लॉटरी जिंकण्याची मिळू शकते संधी

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कर संकलन वाढविण्याची सरकारची योजना, जीएसटी परिषद अंतिम निर्णय घेईल
  • खरेदीचे बिल पोर्टलवर अपलाेड हाेईल

नवी दिल्ली - वस्तू खरेदी केल्यानंतर बिल घेण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकार एक लॉटरी योजना सुरू करणार आहे. या अंतर्गत १० लाख रुपये ते १ कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे देण्यात येतील. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लॉटरी योजनेअंतर्गत खरेदी केल्यानंतर ग्राहकांना जीएसटीच्या प्रत्येक बिलावर लॉटरी जिंकण्याची संधी मिळेल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे सदस्य जॉन जोसेफ यांनी ही माहिती दिली. उद्योग संस्था असोचॅमच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जोसेफ म्हणाले, आम्ही एक नवीन लॉटरी योजना सुरू करत आहोत. जीएसटी अंतर्गत प्रत्येक बिलावर लॉटरी जिंकण्याची संधी असेल.  याची सोडत ‌‌‌‌‌‌काढली जाईल. लॉटरीचे मूल्य एवढे असेल की, २८ टक्के बचत केल्यास माझ्याकडे १० लाख ते १ कोटी रुपये जिंकण्याची संधी असेल, अशी भावना ग्राहक व्यक्त करतील. शेवटी ग्राहकांच्या व्यवहारात बदल घडवून आणण्याचा प्रश्न आहे. जीएसटी महसुलात झालेली तूट कमी करण्यासाठी सरकार व्यवसाय ते ग्राहक अशा विविध पर्यायांवर विचार करत आहे. यामध्ये लॉटरी आणि क्यूआर कोड आधारित व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा समावेश आहे. खरेदीचे बिल पोर्टलवर अपलाेड हाेईल 

योजनेअंतर्गत खरेदीचे बिल पोर्टलवर अपलोड करण्यात येतील. लॉटरी सोडत कॉम्प्युटर प्रणालीद्वारे काढण्यात येईल. विजेत्यांना याबाबत माहिती द्यावी लागेल. जीएसटी प्रणाली अंतर्गत चार कर स्लॅब ५, १२, १८ आणि २८ टक्के आहेत. याशिवाय या व्यतिरिक्त लक्झरी व नाशवंत नसलेल्या उत्पादनांवरही सर्वाधिक कर लावून उपकर आकारला जातो.