आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री ५ व सहकारमंत्री ६ तालुक्यांचा करणार दौरा; दुष्काळ पाहणीनंतर शासनाला देणार अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दुष्काळाची पाहणी करून अहवाल सादर करावा, असे फर्मान मुख्यमंत्री यांनी काढले आहे. त्यानुसार पालकमंत्री विजयकुमार देशमुख पाच तालुक्यातील गावांची तर सहकारमंत्री सुभाष देशमुख सहा तालुक्यांची पाहणी करणार आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे शुक्रवारी (दि. ११) दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार गावांची पाहणी करतील तर पालकमंत्री देशमुख हे शनिवारपासून दुष्काळाची पाहणी करणार आहेत. 


पालकमंत्री देशमुख हे अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा व पंढरपूर तर सहकारमंत्री करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांची पाहणी करतील. सहकारमंत्री हे शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी, शिरवळ, कणबस व बोरूळ गावांमध्ये जाऊन दुष्काळाची पाहणी करतील. गावांची निवड जिल्हाधिकारी करणार असून दौऱ्यात संबंधित तालुक्याचे तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी व इतर यंत्रणा असणार आहे. 


दुष्काळ पाहणीसाठी निवड केलेल्या गावांमध्ये बैठक घेण्यात येईल. पिकांची स्थिती, पाणीपुरवठ्याची सुविधा, चाऱ्यांची स्थिती, पाणीपुरवठ्याच्या योजना याचा आढावा घेण्यात येणार आहे. पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.

- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री 

बातम्या आणखी आहेत...