आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी शहरात; गाळे, हाॅकर्सप्रकरणी हाेणार सखाेल चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेतील सत्ता प्राप्तीनंतर भाजपकडून वर्षभरात जाहीरनाम्यातील बाबींची पूर्तता करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. साेमवारी मंत्री गिरीश महाजनांसाेबत बैठकीनंतर अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी बुधवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. शनिवारी जळगाव दाैऱ्यावर अाल्यानंतर गाळे व हाॅकर्सच्या प्रश्नी चर्चा केली जाणार अाहे. 


महापालिका निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागांवर भाजपला दणदणीत विजय मिळाला अाहे. निवडणुकीची प्रक्रिया अाटाेपल्यानंतर अायुक्त चंद्रकांत डांगे शनिवारी मुंबईला रवाना झाले हाेते. साेमवारी डांगे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या वेळी भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या अाश्वासनानुसार कामांना सुरुवात करायची अाहेत. नागरिकांना निकाल द्यायचा असल्याचे महाजन यांनी डांगे यांना सांगितले. निधीची चिंता करू नका, कामांचे अंदाजपत्रक तयार करा, अशा सूचना देखील केल्या. त्यानंतर अायुक्त डांगे यांनी पालकमंंत्री चंद्रकांत पाटील यांचीदेखील भेट घेतली. ११ राेजी जळगाव दाैऱ्यावर येत असल्याने त्याच दिवशी गाळ्यांसंदर्भात तसेच हाॅकर्सप्रश्नी चर्चा करू, असे अायुक्तांना सांगितले.


अधिकाऱ्यांचा अभ्यास दाैरा
शहरातील रस्ते, पथदिवे, दुभाजकांचे सुशोभिकरण यासह नियाेजीत विकास कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांचा अभ्यास दाैरा अायाेजित करण्यात येणार अाहे. शहरातील रस्ते व त्याला फुटपाथची निर्मिती करायची असल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागपूर येथे पाहणीसाठी पाठवणार असल्याचे अायुक्त डांगे यांनी सांगितले. अायुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच महापालिका निवडणूक लागली हाेती. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून विकासाची कामे सुरू झाली नव्हती. अाता अपूर्णावस्थेतील कामांना वेग देणे तसेच नवीन कामांना लवकरच सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...