आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली ढोेपे कुटुंबियांची भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंजा (लाड)- कारंजा येथील जवान सुनील ढोपे यांचा १५ सप्टेंबर रोजी कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला. सदर प्रकरणी वाशिम जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे महसूलराज्यमंत्री संजय राठेाड यांनी १९ सप्टेंबर रोजी दुपारी भेट घेवून कुटुंबियांचे सांत्वन केले. 


यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपविभागीय अधीकारी रमेश सोनुने, उपविभागीय अधीकारी डाॅ.शरद जावळे, तहसिलदार रणंजित भोसले, यांची उपस्थिती होती. भेटी दरम्यान पालकमंत्री राठोड यांनी जवान ढोपे यांच्या कुटुंबियांची भुमिका जाणून घेत मी व प्रशासन तुमच्या पाठिशी आहे असे सांगत त्यांना पार्थिव ताब्यात घेण्याची विनंती केली. शिवाय ढोपे कुटुंबियांच्या सविस्तर मागण्या लेखी घेवून त्या वरिष्ठ स्तरावर पाठविण्याची कारवाई करण्याचे देखील आदेशित केले. यावेळी ढोपे कुटुंबियांनी जवान ढोपे यांच्या मृत्यूस करणीभूत असलेल्या बीएसएफ मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, जवान ढोेपे यांना शहीद घोषित करावे, पार्थिवाचे कारंजात पुन्हा शवविच्छेदन करावे, या व इतर मागण्या पालकमंत्र्यासह प्रशासनासमोर मांडल्या. परंतू सदरचा विषय हा राज्यसरकारच्या कार्यक्षेत्रातील नसून आपण समस्यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी पालकमंत्री यांनी दिले. तरीही कुटुंबिय जवान ढोपे यांचे पार्थिव ताब्यात न घेण्याच्या भुमिकेवर ठाम आहेत. जिल्ह्यातील एका जवानाचा कर्तव्य बजावत असतांना मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री या नात्याने पालकमंत्री राठोड यांनी यापूर्वीच कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन करणे अपेक्षित होते. परंतू जवान ढोपे यांच्या कुटुंबियाच्या सांत्वनासाठी व निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री तब्बल चार दिवस उशिरा आल्याने त्यांच्या येण्याची शहरात जोरदार चर्चा होत आहे. कारंजा शहर पोलिसांनी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवान ढोपे यांच्या कुटुंबियांच्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...