आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: 201 शेतकऱ्यांची केली होती कत्तल, कोर्टाने आरोपीला सुनावली तब्बल 5 हजार वर्षांची कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाटेमाला सिटी - ग्वाटेमाला येथील एका कोर्टाने बुधवारी माजी सैनिकाला गृह युद्धात 201 शेतकऱ्यांचा नरसंहार प्रकरणी 5,160 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा नरसंहार मध्य अमेरिकेतील गृहयुद्धाची सर्वात क्रूर घटना होती. न्यायालयाने सांतोस लोगेज या माजी सैनिकाला त्या नरसंहारात 171 लोकांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले. याबाबत कोर्टाने प्रत्येक हत्येसाठी 30-30 वर्षाची शिक्षा अशी एकूण 5,130 वर्षांची शिक्षा ठोठावली. इतकेच नाही, तर माजी सैनिकाला एका लहान मुलाची हत्या केल्याप्रकरणी 30 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

 

सुनावण्यात आलेली शिक्षा सांकेतिक शिक्षा आहे. कारण ग्वाटेमालामध्ये तुरुंगातील शिक्षेचा कमाल कालावधी 50 वर्ष आहे. लोगेज कॅबिल या अमेरिकेकडून प्रशिक्षित अशा सैन्य दलाचा सदस्य होता. त्याला अमेरिकेने अटक केल्यानंतर 2016 मध्ये निर्वासित केले होते. चौकशीत तो याच दलाचा सदस्य होता असे स्पष्ट झाले. लोगेजने डिसेंबर 1982 मध्ये मेक्सिकोच्या सीमेवरील ग्वाटेमाला परिसरात नरसंहार केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या मते, 1996 पर्यंत चाललेल्या ग्वाटेमाला गृह युद्धात जवळपास 2 लाख लोकांचा बळी गेला होता.

बातम्या आणखी आहेत...