Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

12 पैकी 5 राशींसाठी भाग्यशाली राहील नववर्ष, 7 राशींचे बिघडू शकते पूर्ण होत आलेले काम

रिलिजन डेस्क | Update - Apr 03, 2019, 12:02 AM IST

शनीच्या शनिवारपासून सुरु होत आहे हिंदू नववर्ष, नवीन वर्षाचा राजा राहील शनी, सूर्यदेव असणार मंत्री, मेष राशीच्या लोकांनी

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  शनिवार 6 एप्रिल 2019 पासून हिंदू नववर्ष म्हणजे नवीन संवत्सर सुरु होत आहे. या संवत्सरचे नाव परिधावी आहे. स्वामी इंद्राग्नी राहतील. नवीन वर्षाचा राजा शनी आणि मंत्री सूर्यदेव राहतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सध्या चैत्र मास सुरु आहे. चैत्र मासातील शुक्र पक्षातील प्रतिपदा (6 एप्रिल) तिथीला गुढीपाडवा साजरा केला जातो. या तिथीपासून चैत्र नवरात्री आणि हिंदू नववर्ष सुरु होते.


  चुकीचे काम करणाऱ्या लोकांच्या वाढू शकतात अडचणी
  या वर्षाचा राजा शनी असल्यामुळे चुकीचे काम करणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे सांभाळून राहावे. शनी न्यायदेवता आहेत. शनिदेव कर्मानुसार व्यक्तीला दंड आणि शुभफळ प्रदान करतात. पं. शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी कसे राहील हे नववर्ष...


  मेष
  राशी स्वामी मंगळ आणि वर्षाचा राजा शनी तसेच मंत्री सूर्य असल्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. अधिकाऱ्यांशी वाद घालू नये अन्यथा तुमचेच नुकसान होऊ शकते. सावध राहावे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसे राहील हे नववर्ष...

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  वृषभ 
  राशी स्वामी शुक्र आणि शनी मित्र ग्रह आहेत. यामुळे या राशीच्या लोकांना यश प्राप्त होऊ शकते. मंत्री सूर्यसुद्धा अनुकूल राहील. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील.
   

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  मिथुन
  राशी स्वामी बुध आणि शनी यांच्यामध्ये समभाव आहे. यामुळे मिथुन राशीचे लोक स्वतःचे काम करवून घेण्यात यशस्वी होतील. कामामध्ये कोणतेही अडचण निर्माण होणार नाही. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  कर्क
  राशी स्वामी चंद्र आणि कर्कमध्ये शत्रुत्व आहे परंतु चंद्र आणि सूर्य मित्र असल्यामुळे हा काळ सामान्य राहील. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. स्वतःवर विश्वास ठेवावा. काम पूर्ण होतील.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  सिंह
  राशी स्वामी सूर्य आणि शनी, दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत. तरीही तुमच्यासाठी स्थिती सामान्य राहील. इतरांच्या मदतीने तुमचे काम पूर्ण होईल. घरामध्ये सुख कायम राहील.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  कन्या 
  राशी स्वामी बुध आणि वर्षाचा राजा शनी यांच्यामध्ये समभाव आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळेल. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढा जास्त फायदा. कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहील.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  तूळ
  राशी स्वामी शुक्र आणि वर्षाचा राजा शनी मित्र आहेत. या राशीच्या लोकांना यश प्राप्त होईल. मंत्री सूर्यही लाभ करून देईल. समाजात मान-सन्मान वाढेल.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  वृश्चिक
  राशी स्वामी मंगळ आणि वर्षाचा रजा शनी यांच्यामध्ये शत्रू भाव आहे परंतु मंत्री सूर्यासोबत मैत्री आहे. या वर्षी दिखावा करण्यापासून दूर राहावे. कामाशी काम ठेवावे. विनाकारण इतरांच्या कामामध्ये दाखल देऊ नये.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  धनु 
  राशी स्वामी गुरु आणि शनी यांच्यामध्ये सामान्य भाव आहे. हा काळ चांगला राहील. कामे वेळेवर पूर्ण होतील. यश प्राप्त होईल.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  मकर 
  या राशीचा स्वामी शनी नवीन वर्षाचा राजा आहे. तुमच्यासाठी लाभाची स्थिती निर्माण होईल. सर्व kary वेळेवर पूर्ण होतील. एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते. मान-सन्मान मिळेल.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  कुंभ
  या राशीचा स्वामी शनी आणि या वर्षाचा राजाही आहे. हे वर्ष तुमच्यासाठी फायदा करून देणारे राहील. सर्व काम यशस्वीपणे पूर्ण होतील आणि सन्मानही प्राप्त होईल.

 • gudi padwa 2019 hindu navvarsh rashifal in Marathi

  मीन 
  वर्षाचा राजा शनी आणि या राशीचा स्वामी गुरु, दोघेही मित्र आहेत. यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी शुभ राहील. यशासोबतच धन प्राप्ती होईल.

Trending