आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपी लॉ कॉलेजचा अंदाज किती तंतोतंत! 'एमपी'च्या चाचणीतील 80% प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत विधी शाखेची (एलएलबी प्री लाॅ) प्रथम सत्राची परीक्षा सध्या सुरू असून आतापर्यंत चार विषयांचे पेपर्स झाले आहेत. 'योगायोग' असा की या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि १५ दिवसांपूर्वी शहरातील माणिकचंद पहाडे अर्थात एम.पी. लॉ कॉलेजमध्ये झालेल्या अंतर्गत पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका यात तब्बल ८० ते १०० टक्के साधर्म्य आढळून येते आहे. त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा 'योगायोग' सुखद असला तरी अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या भुवया मात्र त्यामुळे उंचवल्या आहेत. 

 

एम.पी. लाॅ काॅलेजमध्ये दोन आठवड्यांपूर्वीच ही अंतर्गत पूर्वपरीक्षा घेण्यात आली. ८० गुणांची अशी पूर्वपरीक्षा कोणत्याही विधी महाविद्यालयात होत नाही, असे काही महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. महाविद्यालयांनी २० गुणांची अंतर्गत परीक्षा घेणे अपेक्षित असते, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. 

 

मात्र, या महाविद्यालयाने तब्बल ८० गुणांची ही पूर्वपरीक्षा घेतली, तीही विद्यापीठ परीक्षेच्या केवळ दोन आठवडे आधी. या परीक्षेत विचारले गेलेलेच ८० ते १०० टक्के प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेतही विचारले जात आहेत. काही प्रश्न तंतोतंत जसेच्या तसे आहेत, तर काही प्रश्नांच्या शब्दरचनेत किरकोळ बदल असून उत्तर मात्र सारखेच असेल अशी स्थिती आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडे अजून तरी कोणी काही तक्रार केलेली नाही किंवा निदर्शनास आणून दिलेले नाही, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे म्हणणे आहे. 

 

दिव्य मराठी विशेष | समान प्रश्नांची अशी अाहेत काही उदाहरणे 
Paper- Political science 
एम.पी. लॉ कॉलेजचे प्रश्न 
Q-2-Define the political science and explain its nature and scope. 
Q-8-Define the Sovereignty and explain various kind of Sovereignty. 
विद्यापीठाचे प्रश्न 
Q-2- Define political science and explain why do you study of political science? 
Q-6-Discuss the features of Sovereignty and explain various kind of Sovereignty. 

Paper- Sociology 
एम.पी. लॉ कॉलेजचे प्रश्न 
Q-2- Discuss the concept of social group and importance of primary and secondary group. 
Q-3-Elaborate the theme of other social institutions. 
विद्यापीठाचे प्रश्न 
Q-5-Describe with illustrations the characteristics of primary and secondary groups. 
Q-7-Elaborate the theme of other social institutions. 

 

अशी आहे पद्धत : एकूण परीक्षा १०० गुणांची असते. विद्यापीठाची लेखी परीक्षा ८० गुणांची असते आणि महाविद्यालयांनी अंतर्गत परीक्षा घेऊन २० पैकी गुण द्यायचे असतात. त्यासाठी बहुतांश विधी महाविद्यालये २० गुणांची चाचणी परीक्षा घेतात. ८० गुणांची पूर्वपरीक्षा घेणारे एमपी लाॅ काॅलेज हे विरळा आहे. 

 

1. ८० - २० चा सिलॅबस आहे. यात आम्ही २० गुणांची परीक्षा घेतो. ८० मार्कांच्या गुणांच्या परीक्षा घेण्याचा नियम नसल्याने आम्ही त्या घेतल्या नाहीत. 
बी.एस. बेहरा, प्राध्यापक, आंबेडकर लॉ कॉलेज 

 

2. दोन प्रश्नपत्रिकांचे अवलोकन केले असता ८० ते ९० टक्के गुणांचे प्रश्न समान आहेत. काहींमध्ये शब्द थोडे बदललेले असले तरी प्रश्नांचे उत्तर मात्र एकच आहे. - अॅड. नईम शेख, विधितज्ज्ञ 

 

'एमपी'च्या चाचणीतील ८०% 
प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेत 

Paper : Contract 
एम.पी. लॉ कॉलेजचे प्रश्न 
Q-2 : What are the various remedies available to a person in the case of breach of contract? 
Q-3 : Explain the law relating to competency of parties to contract. 

विद्यापीठाचे प्रश्न 
Q-5 : Explain the rule of Competency of parties to a contract. 
Q-6 : What is the breach of contract? What remedies are available to an aggrieved person in case of breach of contract? 

हा योगायोग समजावा 
अभ्यासक्रम बदललेला असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी पूर्वपरीक्षा घेतली गेली. या परीक्षेतील प्रश्न विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते असल्यास हा योगायोग समजावा. श्रीकांत शिरसाठ, प्राध्यापक, एम.पी. लॉ कॉलेज 

Paper : Constitution Law 
एम.पी. लॉ कॉलेजचे प्रश्न 
Q-5 : The right to religions of persons and denominations are not absolute. Critically examine and also explain inter- relationship of Article 25 and 26 of the Constitution. 
Q-7 : "The Directive principles of state policy are not enforceable in the court of law, nevertheless they are fundamental in the governance of the contry, explain. 

विद्यापीठाचे प्रश्न 
Q-6 : The right to religions of persons and denominations are not absolute. Critically examine and also explain inter- relationship of Article 25 and 26 of the Constitution. 
Q-8 : "Directive principles of state policy have been decribed as pious declarations or a manifesto of aims and aspiration. " How far do you agree with this statement? 

 

असे आहे विषयानुसार साधर्म्य 
विषय साधर्म्य 

Contract १००% 
Constitution Law ९० % 
Political Science ९० % 
Principles of Sociology ८० % 
 

बातम्या आणखी आहेत...