आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Anil Kapoor To Arijit Singh Guest Arrived In Udaipur For Isha Ambanis Pre Wedding Ceremony

ईशा अंबानी प्री वेडिंग सेरेमनीः उदयपूरमध्ये पोहोचले अनिल कपूर, गायक अरिजीत सिंह, हॉलिवूड सिंग बियॉन्सेचा ग्रुप करणार परफॉर्म, पाहुण्यांकडून आज रॅम्प वॉक करुन घेणार मनीष मल्होत्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायक अरिजीत सिंह आणि अनिल कपूर उदयपूरमध्ये पोहोचले. - Divya Marathi
गायक अरिजीत सिंह आणि अनिल कपूर उदयपूरमध्ये पोहोचले.

उदयपूरः उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीचा येत्या 12 डिसेंबर रोजी विवाहसोहळा आहे. तत्पूर्वी उदयपूर येथे तिचे प्री वेडिंग फंक्शन्स ठेवण्यात आले आहेत. 8 आणि 9 डिसेंबर रोजी होणा-या या सेरेमनीत देश-विदेशातील तब्बल 1800 पाहुणे सहभागी होणार आहेत. 1500 पाहुणे चार्टर्ड प्लेनने येथे पोहोचणार आहेत. उदयपूरच्या डबोक एअरपोर्टवर शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत सुमारे 90 फ्लाइट्स पोहोचल्या. पाहुण्यांसाठी एका खासगी कंपनीचे 92 चार्टर्ड प्लेन हायर करण्यात आले आहेत. सेरेमनीत बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा पाहुण्यांकडून रॅम्प वॉक करुन घेणार आहेत. तर गायक अरिजीत सिंह त्याच्या हिट गाण्यांवर परफॉर्म करणार आहे.

 

आमंत्रण पत्रिकेनुसार, शनिवारी संगीत समारोह होमार आहे. रविवारी ट्राइडेंट लॉन्स येथे अंबानी कुटुंबीय त्यांच्यावतीने स्वदेश बाजार लावणार आहेत. यामध्ये देशातील विविध भागातील हँडीक्राफ्ट आणि टेक्सटाइलशी निगडीत वस्तूंचे 108 स्टॉल्स असतील. यापूर्वी मुकेश अंबानी आणि अजय पीरामल यांचे कुटुंब शुक्रवारी संध्याकाळी शाम नारायण सेवा संस्थानात पोहोचले. येथे त्यांनी दिव्यांग मुलांना जेऊ घातले. 

 

उद्धव ठाकरे, अनिल कपूर पोहोचले, सलमान आज येणार...
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, अनिल कपूर, गायक अरिजीत सिंह, डायरेक्टर डेविड धवन आणि डायरेक्टर विधु विनोद चोप्रा उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. हिलेरी क्लिंटन, वेदांता ग्रुपचे चेयरमॅन अनिल अग्रवाल, सलमान खान, करण जोहर, अक्षय कुमार  आणि वरुण धवन शनिवारी पोहोचणार आहेत. रविवारी उद्योगपती रतन टाटा, गौतम अडानी कुमार मंगलम बिर्ला आणि अमिताभ बच्चनदेखील पोहोचणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचणार असल्याची शक्यता आहे. 

 

करण जोहर होस्ट करणार प्रोग्राम...
संगीत सोहळा शनिवारी होणार आहे. हा कार्यक्रम करण जोहर होस्ट करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान स्टेजवर उपस्थित असतील. संगीत सोहळ्यात ईशा आणि तिचा भावी आनंद पीरामल यांचा डान्स परफॉर्मन्स असेल. ईशा आणि आनंदचे कुटुंबीय दोस्ताना, धूम-3 आणि टाइगर जिंदा या चित्रपटातील गाण्यांवर डान्स करणार आहेत. या संगीत सोहळ्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंट यांनी केली आहे. म्युझिकल नाइटमध्ये फॅशन शोदेखील होणार आहे.  फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीसुद्धा त्यांच्या टीमसोबत शनिवारी पोहोचणार आहे. 

 

बेयॉन्से नोल्स करणार परफॉर्म...
हॉलिवूड गायिका बेयॉन्से नोल्सचा ग्रुप शुक्रवारी उदयपूरमध्ये पोहोचला आहे. प्री वेडिंग सेरेमनीत बेयॉन्से परफॉर्म करणार असल्याचे म्हटले जाते आहे.  

 

पाहुण्यांच्या सोयीसाठी गेस्ट मॅनेजमेंट अॅप...  
एअरपोर्टवर मोठ्या संख्येने उपस्थित हॉस्पिटॅलिटी मेंबर्स पाहुण्यांचे स्वागत करत आहे. सोबतच विमातळावर सिक्युरिटीसाठी प्रायव्हेट गार्ड हजर आहेत. पाहुण्यांच्या सोयीसाठी गेस्ट मॅनेजमेंट अॅप बनवण्यात आले आहे. ड्रायव्हर्सना या अॅपसाठी एक-एक खास फोन देण्यात आला आहे. यामध्ये ट्रेकिंग सिस्टम बसवण्यात आले आहे.

 

सेलिब्रेशनमध्ये काय-काय असेल खास...
सेलिब्रिटी शेफ रितू डालमिया यांच्या मार्गदर्शनात डिशेज बनणार आहेत.
लंच-डिनरमध्ये 400 डिशेज आणि ब्रेकफास्टमध्ये 200 पदार्थ बनणार आहेत.
पाहुण्यांसाठी मनीष मल्होत्राची टीम हजर राहणार आहे.
हॉटेल्सच्या डेकोरेशनसाठी ट्युलिप फुलांचा वापर केला जाणार आहे.
प्रत्येक हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांची सजावट राहणार आहे.
पाहुण्यांसाठी हॉटेलमध्ये पपेट शो असेल. 


दिव्यांग मुलांसोबत अंबानी-पीरामल कुटुंबीयांनी घालवला वेळ...
मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासोबत शुक्रवारी शाम नारायण सेवा संस्थानात पोहोचले. मुकेश-नीता अंबानी, ईशा अंबानी, पीरामल कुटुंबातील अजय-स्वाती पीरामल आणि आनंद पीरामल यावळी उपस्थित होते. या सगळ्यांनी येथे दिव्यांग मुलांसोबत वेळ घालवला आणि त्यांना जेवण जेऊ घातले. वर-वधू आनंद आणि ईशा यांनी मुलांना जेवण वाढले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, उदयपूरमध्ये पोहोचलेल्या पाहुण्यांची छायाचित्रे सोबत दिव्यांग मुलांसोबत अंबानी-पीरामल कुटुंबीय...  
 

बातम्या आणखी आहेत...