आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खान, बिग बींना कपिल शर्माच्या लग्नाचे निमंत्रण, फक्त जेवणावर खर्च होणार 15 लाख रु., असणार 100 पेक्षा जास्त व्यंजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर. कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच लग्न करणार आहे. 12 डिसेंबर रोजी तो हरदेव नगरच्या गिन्नी चतरथसोबत विवाहबंधनात अडकेल. लग्नामध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोणसोबतच अनेक बॉलिवूड सेलेब्स हजर राहणार आहेत. हॉटेल क्लब कबानामध्ये लग्नानंतर रिसेप्शनची प्लानिंग केली जात आहे. 14 डिसेंबरला रिसेप्शन असणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी कपिल नोव्हेंबरमध्ये जालंधर येथे येण्याची शक्यता आहे. लग्नाच्या पार्टीमध्ये पंजाबी फूडसोबतच 100 पेक्षा जास्त व्यंजन असणार आहेत. फक्त जेवणावरच 15 लाख रुपये खर्च केले जातील. 

 

लग्नानंतर कामावर परतणार कपिल 
फॅमिलीच्या जवळच्या लोकांनुसार, कपिल नोव्हेंबरमध्ये सासरी येऊन लग्नाचा प्रोग्राम फायनल करण्याचा प्लान करतोय. कपिलच्या चाहत्यांना त्याला टीव्हीवर पाहण्यासाठी थोडी प्रतिक्षा कावी लागेल. आता त्याचा कॉमेडी शो या वर्षाच्या अखेरीस सुरु होईल. कपिल लग्नानंतर त्याच्या शो घेऊन येणार आहे. सध्या शोची कास्ट, फॉर्मेटचे काही काम पेंडिंग आहे. 

 

सुरु झाली आहे लग्नाची तयारी 
गिन्नी पर्सनल सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहे. कपिल सध्या टीव्हीवर कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. यामुळे लग्नाच्या तयारीला तो जास्त वेळ देऊ शकत नाही. कपिलला डिस्टर्ब होऊ नये याकडे कुटूंबातील लोक काळजी घेत आहेत. कपिलला वाटत होते की, त्याचा कमबॅक शो लॉन्च झाल्यानंतर लग्न व्हावे. पण गिन्नीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि यामुळे लवकर लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

 

यामुळे लवकरात लवकर करत आहेत लग्न 
- कपिलच्या एका जवळच्या मित्रानुसार, 'कपिलने गिन्नीला वचन दिले होते की, ते वर्षाच्या अखेरीपर्यंत लग्न करतील. त्याने त्याच्या कुटूंबालादेखील हेच सांगितले होते, नंतर त्याचा मूड चेंज झाला. कारण त्याला त्याच्या आगामी शोकडे लक्ष केंद्रीत करायचे होते.'
- त्याने दोन्ही कुटूंबांना पुढच्या वर्षीपर्यंत प्रतिक्षा करण्यास सांगितले होते. दोन्ही कुटूंबांना हे मान्य होते. पण गिन्नीच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे. ते काही महिन्यांपासून आजारी आहेत. यामुळे कपिलने लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात ते होम टाउन अमृतसर येथे गेले होते. तिथे त्यांनी पंडितांकडून लग्न मुहूर्त काढला. आता 12 डिसेंबरला त्यांचे लग्न होणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...