आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना- जळगाव येथील छोटीशी शाळा ते अमेरिकेतील “नासा’मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर अशी झेप घेणाऱ्या अनिता पाटील साबळे यांनी भारताशी असलेली नाळ मात्र तुटू दिली नाही. त्या आपल्या वैयक्तिक करिअरमध्ये गुरफटून न जाता भारतीय मुलामुलींनीही अशी मोठी झेप घ्यावी, यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहेत. अंतराळ संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्या अमेरिकेत बसून फेसबुकवरील यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत.
अंतराळ संशोधन हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. अनेक जण या क्षेत्रात करिअरची महत्त्वाकांक्षा बाळगून असतात. पण त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन आणि सुविधा मिळू न शकल्याने त्यांची स्वप्ने अधुरी राहतात. दर वर्षाला भारतातून १२ लाख जण अमेरिकेत जात असल्याची वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनकडे नोंद आहे. अमेरिका व भारतातून एकमेकांच्या देशात जाणाऱ्यांची संख्या वाढावी, दोन्ही देशांकडून प्रयत्नही सुरू आहेत. अमेरिकेत स्थायिक होणारे अनेक अनिवासी भारतीय आपल्या मातृभूमीशी असलेले नाते तोडून कायमस्वरूपी तेथे स्थायिक होऊन आपल्या कुटुंबापुरतेच मर्यादित राहतात. दरम्यान, महाराष्ट्राची कन्या असलेल्या अनिता साबळे मात्र अपवाद आहेत. चार वर्षांपासून स्थायिक झालेल्या अनितांनी तंत्रज्ञानाचा फायदा घेत आठवडा किंवा महिन्यातून एकदा का होईना फेसबुकवरून भारतीयांना अंतराळ संशोधनाविषयी मार्गदर्शन करतात. त्या आधी फेसबुकवर मेसेज टाकतात. त्यानंतर अंतराळवीर होण्याचे स्वप्न बाळगणारे किंवा तसे शिक्षण घेणारे विद्यार्थी अनिता ऑनलाइन संवाद साधू लागताच आपले प्रश्न इनबॉक्समध्ये टाकतात. या प्रत्येक प्रश्नावर अनिता विश्लेषण करतात. यामुळे प्रत्येक या सर्वच विद्यार्थ्यांना इतरांचे प्रश्न व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.
उपक्रमाचे पाठबळ
अनिता साबळे यांचा हा उपक्रम स्नेह बांधिलकीची प्रेरणा देण्याबरोबरच अंतराळवीर होण्याची जिद्द बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठबळ देणारा आहे. शिवाय अनिता यांचा प्रवासही त्यांच्यासाठी प्रेरक ठरत आहे. अनिता मराठी शब्दात टाकलेल्या प्रश्नांना मराठीतूनच उत्तरे देत असल्याने विद्यार्थ्यांना ते समजण्यास अजून सोपे जात आहे.
मराठा आरक्षणावरही चर्चा
लाइव्ह चर्चेदरम्यान, महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी आरक्षण नसल्यामुळे आम्ही मागे राहत आहोत, असे प्रश्न मांडले. यावर पाटील यांनी या प्रश्नाकडे आपण जास्त लक्ष देण्यापेक्षा जिद्दीने पुढे जात राहिलो तर आरक्षणाची गरज नाही. आपण कोणत्याही आरक्षणाविना या पदापर्यंत पोहोचल्याचे अनिता यांनी सांगितले.
तासाभरात १३७ प्रश्नांवर मार्गदर्शन
ऑनलाइन फेसबुकवर सोमवारी रात्री १०.३० ते ११.३० वाजेच्या सुमारास अनिता यांनी चर्च केली. तासाभरात त्यांचा हा व्हिडिओ १४७ जणांनी शेअर केला. तर १३७ जणांच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. ४ हजार जणांनी या चर्चेत सहभाग नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.