आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सीआयडी\' नाही, तर या शोच्या नावे आहे जगातील सर्वात जास्त काळ ऑनएयर राहण्याचा रेकॉर्ड, 57 वर्षे चालला शो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 21 वर्षांपासून टीव्हीवर येत असलेल्या 'सीआयडी' शोचा शनिवारी 1548वा एपिसोड प्रसारित झाला. आता हा शो 3 महिन्यांच्या ब्रेकवर आहे. भारतात नेहमीच दिर्घकाळ सुरु असलेल्या शोची आलोचना केली जाते. पण मालिकांना जास्त काळ चालवण्यासाठी इतर देश भारतापेक्षा पुढे आहेत. जगातील सर्वात जास्त सुरु राहणा-या शोचा रेकॉर्ड अमेरिकेतील शोच्या नावे आहे. याचे नाव 'गाइडिंग लाइट' असे होते. हा एक सोप ओपेरा(काल्पनिक कथांवरील ड्रामा शो) होता. 1952 ते 2009 पर्यंतच्या काळात या मालिकेचे 15,762 एपिसोड प्रसारित झाले. जर हे शो वर्षाच्या 365 दिवसही दाखवले तर हे पुर्ण होण्यास 43 वर्षे लागले असते.

 

57 वर्षे सुरु होती मालिका 
अमेरिकी शो 'गायडिंग लाइट'चे प्रसारण 1937 मध्ये पहिल्यांदा रेडिओवर झाले. नंतर 1952 मध्ये हे टीव्हीवर आले. एकूण 57 वर्षे हा शो सुरु होता. तर ब्रिटेनचा 'कोरोनेशन स्ट्रीट' जगातील सर्वात जुना सोप ओपेरा आहे, तो आजही सुरु आहे. याचे 9500 पेक्षा जास्त एपिसोड झाले आहेत. 

 

भारतात दिर्घकाळ शो सुरु राहण्याचा रेकॉर्ड या शोच्या नावे 
भारतात दिर्घकाळ शो सुरु राहण्याचा रेकॉर्ड एका मल्याळम भाषेतील शोच्या नावे आहे. हा राजकारण आणि व्यंग्य आधारित प्रोग्राम होता. 'मुंशी' असे या शोचे नाव आहे. 2000 पासून या शोचे जवळपास 6,400 एपिसोड आले आहेत. हिंदी भाषेत सर्वात जास्त एपिसोड असणारे शो म्हणजे 'ये रिश्ता क्या कहलाता है' हा आहे. याचे आतापर्यंत 2750 पेक्षा जास्त एपिसोड आले आहेत. यानंतर  'सावधान इंडिया'चा नंबर लागतो. याचे 2600 एपिसोड प्रसारित झाले आहेत. हे शो सोप ओपेरा नाही, हे क्राइम शोच्या श्रेणीमध्ये येते. भारतात सोप ओपेराची सुरुवात 'हम लोक' सीरियल मानली जाते. याचे फक्त 154 एपिसोडच प्रसारित झाले होते. 

 

गेम शोच्या बाबतीत फ्रान्स सर्वात पुढे 
कोणत्याही फॉर्मेट शोविषयी बोलायचे झाले तर आज पर्यंत फ्रेंच गेम शो 'देस शिफ्रेस एत देस लेंत्रे'(नंबर्स अँड लेटर्स) आहे, याचे अतापर्यंत 20,000 पेक्षा जास्त एपिसोड प्रसारित झाले आहेत.

 

सीआयडीचा पहिला एपिसोड येण्यास लागले होते 6 वर्षे 
'सीआयडी' शो बृजेंद्र पालने प्रोड्यूस केला होता. त्यांनी स्वतः या शोमध्ये डीसीपी चित्रोलेची भूमिका साकारली होती. या शोजची शूटिंग फ्रान्स, स्विट्जरलँड आणि लंडनसारख्या विदेशी लोकेशन्सवरही झाली आहे. या शोमध्ये शाहरुख खान, आमिर खानपासून सलमान खान यांच्या चित्रपटांचे प्रमोशनही करण्यात आले आहे. यामधील प्रमुख भूमिका या एसीपी प्रद्युम्न, इंस्पेक्टर दया आणि इंस्पेक्टर अभिजीत आहेत. या शोमध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणारे शिवाजी साटम प्रत्येक एपिसोडसाठी एक लाखांपेक्षा जास्त पैसे घ्यायचे असे बोलले जाते. 

 

बातम्या आणखी आहेत...