आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांब केसांचा विक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या महिलेसाठी किंवा मुलीसाठी तिचे लांब केस हे एखाद्या देणगीपेक्षा काही कमी नसतात. आपले लांब केस त्या खूप जपून ठेवतात. त्यांची योग्यरीत्या देखभाल करतात. त्यात एखाद्या महिलेचे केस लांब असतील तर त्यांची जपणूक करण्याचा छंद महिलांना लागतो. गुजरातच्या अरावली येथे राहणारी नीलांशी पटेललाही लांब केस वाढविण्याचा छंद आहे. त्या छंदाचे तिने विक्रमात रूपांतर केले आहे.  १७ वर्षीय नीलांशी पटेल हिने १९० सेंटिमीटरसह सर्वात लांब केस असलेली किशोरी म्हणून या श्रेणीत आपलाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. २०१८ मध्ये तिच्या केसांची लांबी १७०.५ सेंमी मोजण्यात आली होती. नीलांशी या नव्या विक्रमामुळे खूप खुश दिसत होती. ती म्हणाली, मी जेथे जाते, तेथे सर्वजण माझ्यासोबत सेल्फी काढायला येतात. मला एक सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटते आहे. आपल्या लांब केसांचे रहस्य सांगताना नीलांशीने स्पष्ट केले की, जेव्हा ती लहान होती तेव्हा एका हेअर ड्रेसरने तिचे केस चांगल्या प्रकारे कापले नव्हते. त्यामुळे तेव्हापासून ठरवले की आपण कधी केस कापायचे नाही.

बातम्या आणखी आहेत...