आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये दहावीची विद्यार्थिनी फ्रेया झाली गुगल कोडिंग विजेती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुगलकडून आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कोडिंग स्पर्धेत उद््गम स्कूलच्या दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या फ्रेया शहा या विद्यार्थिनीस विजेता घोषित करण्यात आले आहे. गुजरातमधील फ्रेया शहा विद्यार्थ्यांच्या वाढत्या ताणावावर अॅप्लिकेशन तयार करणारी एकमेव विद्यार्थिनी आहे. या अॅप्लिकेशनची सर्व कोडिंग फ्रेयाच करते. गेल्या वर्षी फ्रेया या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती.

 

विद्यार्थ्यांत तणाव : प्रश्नांतून उपाय  
फ्रेयाकडून तयार केलेल्या अॅप्लिकेशनमध्ये तणाव अनुभवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल प्रश्न विचारले जातील. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांच्यात तणाव कसा आहे हे ठरवले जाते.  त्यानंतर विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जातेे. लवकर हे अॅप ऑनलाइन उपलब्ध असेल.

 

यूट्यूबवर व्हिडिओ पाहून कोडिंग शिकली  
फ्रेया म्हणाली, मला लहानपणापासून अॅप्लिकेशन तयार करण्यात रुची होती. यूट्यूबरवर व्हिडिओ पाहून अॅप्लिकेशनसाठी कोडिंग करणे शिकले. शाळेत शिक्षकांनी याबाबत खूप काही शिकवले. गेल्या वर्षीसुद्धा मी अंतिम फेरीत पोहोचले होते. यात देशभरातील नामवंत शाळेतील मुलांना स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्याची संधी मिळते.

बातम्या आणखी आहेत...