गुजरातच्या 3 उद्योगांचा / गुजरातच्या 3 उद्योगांचा पाकिस्तानवर बहिष्कार; 30 वर्षांचे संबंध, पण आता माल पाठवणे बंद

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये संतापाची भावना वाढते आहे.

Feb 26,2019 10:56:00 AM IST

वापी - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये संतापाची भावना वाढते आहे. गुजरातमधील अनेक उद्योगांनी पाकिस्तानला मालाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


यानुसार, ३ उद्योगांनी पाकिस्तानला डाइज न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही केमिकल उद्योगाकडून पाकिस्तानसह अन्य देशातही निर्यात केली जात होती. मात्र, आता त्यांनी पाकसोबत व्यापारी संबंध ठेवणार नसल्याचे सांगितले. आशियातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या वापी उद्योग वसासतीतील उद्योगांकडून अमेरिका, जपान, कोरिया, चीन ऑस्ट्रेलियासह अन्य देशातही निर्यात केली जाते.


बांगला देश, पाकिस्तान, इराण व तुर्की यासारख्या मुस्लिम देशांतही अनेक उद्योगांकडून निर्यात होते. १४ फेब्रुवारी राेजी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले होते. त्यामुळे वापीमधील तीन मोठ्या केमिकल उद्योगांनी पाकिस्तानशी या पुढे व्यापारी संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या उद्योगांत डायचे उत्पादन होते.


ते पाकिस्तानला निर्यात करत असत. त्यांनी अन्य उद्योगांनाही दिलेल्या संदेशात म्हटले, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्राेत्साहन दिले जात आहे. यासाठी पाकिस्तानला निर्यात करणे भारतीय उद्योगांनी बंद करावे.


निर्यात बंद झाल्याने चीनकडून माल घेण्याची शक्यता : गुजरातसह देशभरात पाकिस्तानला दोन ठिकाणाहून निर्यात होते. यात मुंबई जेटी येथून समुद्रमार्गे कराची ला (पाकिस्तान)माल पाठविण्यात येतो. तसेच पंजाबमधून अमृतसर येथून समझौता एक्सप्रेसने माल पाठविण्यात येतो. आता आपल्या उद्योगाकडून माल येणे बंद झाल्यास पाकिस्तान चीनकडून माल विकत घेईल.


दोन्ही ऑर्डर रद्द केल्या
२० वर्षांपासून पाकिस्तानात स्टॉकिस्ट ब्ल्यू डाईज एक्सपोर्ट करत होतो. पाकिस्तानात वर्षातून ३० लाखांचा माल निर्यात होतो. आताच पाकिस्तानातून मिळालेल्या दोन ऑर्डर्स आम्ही रद्द केल्या आहेत. तसेच यापुढे पाकिस्तानला माल निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आमच्या डायचा वापर रंग तयार करण्यासाठी तसेच कपडे रंगविण्यासाठी करतो. - स्नेहल देसाई, उद्योगपति, वापी


३० वर्षांचे संबंध, पण आता माल पाठवणे बंद
गेल्या ३० वर्षापासून आमचे पाकिस्तानातील उद्योगपतीशी संबंध होते. वर्षातून लाखो रुपयाचे डाय आम्ही निर्यात करत होतो. आता दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे माल पाठवणे बंद केले आहे. दोन्ही देशात शांतता स्थापित झाल्यावरच आम्ही यावर विचार करू. आता माल पाठवणार नाही.
- नितीन शहा, उद्योगपती, वापी

X