आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat 7 Sanitation Workers Die Cleaning Hotel Septic Tank In Vadodara Fartikui Village

गुजरातमध्ये 7 मजुरांचा गुदमरून मृत्यू, हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरून सफाई करतानाची घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा - गुजरातच्या एका हॉटेलमध्ये सात मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. हे सर्वच मजूर हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरून सफाई करत होते. त्याच दरम्यान सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 3 हॉटेलचे कर्मचारी होते. तर उर्वरीत 4 जण मजूर होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हॉटेल मालक अब्बास भोरानियाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.


वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालकाने सेप्टिक टँकच्या सफाईसाठी महेश पतनवाडिया (47), अशोक हरिजन (45), ब्रजेश हरिजन (23), महेश हरिजन (25) या चार मजुरांना बोलावले होते. हे मजूर टँकमध्ये सफाईसाठी उतरले होते. त्यांच्या मदतीसाठी हॉटेलमध्ये काम करणारे विजय चौधरी (22), सहदेव वसावा (22) आणि अजय वसावा (22) हे देखील आत उतरले होते. वेळ निघत गेला आणि कर्मचारी टँकबाहेर आलेच नाही. सुरुवातीला सफाई काम सुरू असल्याचे वाटल्याने संशय आला नाही. परंतु, काहीच हालचाली दिसत नसल्याने हॉटेल व्यवस्थापनाने डाभोई पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाला बोलावले. यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परंतु, टँकमध्ये विषारी वायूचा दाब वाढल्याने सर्वांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...