आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सूर्यवंशम\' चित्रपटाची येथे झाली होती शूटिंग, पाहा ठाकुर साहेबांची हवेली, Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नई दिल्लीः महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच आपला 76 वा वाढदिवस शेअर केला. या निमित्ताने आज त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'सूर्यवंशम' चित्रपटाविषयी काही गोष्टी जाणुन घेऊया. हा चित्रपट टीव्हीवर वारंवार प्रसारित होणा-या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट एवढ्या वेळा टीव्हीवर दाखवला गेला, की त्यावर सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलदेखील करण्यात आले. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका वठवली होती. त्यांनी साकारलेल्या भानु प्रताप सिंह आणि हीरा ठाकुर या भूमिका लोकांच्या चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत. नुकताच म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने divyamarathi.com वाचकांना त्या हवेलीविषयी सांगत आहे, जिथे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. 


गुजरातमध्ये झाले होते चित्रपटाचे चित्रीकरण...
-'सूर्यवंशम' या चित्रपटाचे शूटिंग भारतासोबतच श्रीलंकेत झाले होते. गुजरात येथील बलराम पॅलेस रिसॉर्ट  आणि हैदराबादमध्ये चित्रपटातील अनेक दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले होते.
- चित्रपटात दाखवण्यात आलेली हवेली ही प्रत्यक्षात गुजरातच्या पालनपुरमधील एक रिसॉर्ट आहे. त्याचे नाव बलराम पॅलेस आहे.
- बलराम पॅलेस रिसॉर्ट हे पालनपूरच्या नॅशनल हायवे नं 14 पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या चितरासानी गावात आहे.
अहमदाबादपासून हे अंतर 160 किलोमीटर एवढे आहे. 


नवाबांचे हंटिंग रिट्रीट होते हे पॅलेस
- बलराम पॅलेसची निर्मिती लोहानी नवाबच्या हंटिंग रिट्रीटसाठी म्हणून करण्यात आली होती. 1922 ते 1936 याकाळात या हवेलीचे बांधकाम सुरु होते. या हवेलीचे वैशिष्ट्य  म्हणजे येथे लॉर्ड माउंटबेटन यांनी भेट दिली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, या आलिशान रिसॉर्टचे खास PHOTOS....

 

बातम्या आणखी आहेत...